OnePlus Nord N10 5G आणि Nord100 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
OnePlus Nord Smartphone Launched In India (Photo Credits: OnePlus India)

टेक कंपनी OnePlus ने गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात OnePlus Nord10 G आणि Nord N100 स्मार्टफोन ब्रिटेन येथे लॉन्च केला होता. त्यानंतर आता कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन अमेरिकत लॉन्च केले आहेत. या दोन्ही हँडसेटचे डिझाइन OnePlus 8T सारखाच आहे. फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास Nord N100 मध्ये क्वॉलकॉमचे Snapdragon 690 प्रोसेसर दिले आहे. तर Nord N100 स्मार्टफोन मध्ये Snapdragon 460 चिपसेट लैस आहे.(OnePlus 8T 5G स्मार्टफोन दिला जातोय धमाकेदार डिस्काउंट ऑफर, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

OnePlus Nord10 5G स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे. अॅन्ड्रॉइड आधारित OxygenOS 10.5 वर हा स्मार्टफोन काम करणार आहे.तसेच स्मार्टफोनमध्ये 6.49 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिफ्रेश रेट 90Hz आहे. त्याचसोबत फोनमध्ये Qualcomm Snapdragon 690 5G प्रोसेसर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिला आहे. हा स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. या व्यतिरिक्त या डिवाइसमध्ये 64MP क्वाड कॅमेरा सेटअप सपोर्ट मिळणार आहे. या फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा ही दिला जाणार आहे.

यामध्ये 4300mAh ची बॅटरी ही दिली गेली आहे. जी Warp Charge 30T फास्ट चार्जिंग फिचर्स सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त या फोनमध्ये 5G, 4G, LTE, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत.(Vivo V20 (2021) स्मार्टफोन Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

OnePlus Nord N100 स्मार्टफोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे. तसेच अॅन्ड्रॉइडवर आधारित OxygenOS 10.5 वर काम करणार आहे. वन प्लस नॉर्ड एन100 मध्ये 6.52 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. त्याचसोबत या मध्ये Qualcomm Snapdragon 460 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिला आहे. हा स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवला जातो. या व्यतिरिक्त डिवाइसला 13MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सपोर्ट दिला आहे. यामध्ये 8MP चा सेल्फी फ्रंट कॅमेरा ही मिळणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग फिचर सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत. कंपनीने अमेरिकेत OnePlus Nord N100 5G च्या 6GB रॅमऋ 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 300 डॉलर आणि Nord N100 च्या 4GB रॅम+128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 180 डॉलर ठेवली गेली आहे. दोन्ही स्मार्टफोन विक्रीसाठी 15 जानेवारी पासून सुरु होणार आहे. परंतु हे दोन्ही डिवाइस भारतात कधी लॉन्च करणार याबद्दल माहिती दिली गेली नाही आहे.