Digital Payments: UPI QR Codes लवकरच युरोपमध्येही होणार कार्यरत, NPCI चा वर्ल्डलाइनशी करार केला
Digital Payments | ( Photo Credits: Pixabay.com)

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI), भारतातील डिजिटल पेमेंट सेवा (Digital Payment Service) प्रदाता, जागतिक सेवा प्रदाता वर्ल्डलाइनसोबत भागीदारी केली आहे. जी भारतीयांना युरोपमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरण्याची परवानगी देईल. कंपनीच्या आंतरराष्ट्रीय शाखेने हा करार नुकताच पूर्ण केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना लवकरच युरोपमध्येही UPI QR Codes वापरता येणार आहे. युरोपमध्ये भारतीय व्यवसायाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही सेवा पॉइंट-ऑफ-सेल पेमेंटसाठीही उपलब्ध करून दिली जाईल.

सांगितले जात आहे की, एनपीसीआय इंटरनॅशनल आणि वर्ल्डलाइन यांच्या भागीदारीमुळे युरोपमधील भारतीय व्यापारी आणि पर्यटकांना मदत होणार आहे. यामुळे त्यांना RuPay कार्ड आणि UPI वापरणे सोपे होईल. UPI अंतर्गत, ग्राहक एकासह अनेक बँक खाती लिंक करू शकतात. (हेही वाचा, e-RUPI: ई-रुपी म्हणजे काय? जाणून घ्या नव्या डिजिटल पेमेंट साधनाविषयी)

प्राप्त माहितीनुसार, सेवेचा वापर करून, लोक वर्ल्डलाइन QR कोडद्वारे पेमेंट करू शकतील. कंपनी UPI सेवा स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये विस्तारित करण्याचा विचार करत असल्याचेही समजते. कोरोना महामारीपूर्वी दरवर्षी सुमारे एक कोटी लोक युरोपमध्ये प्रवास करत होते, अशी आकडेवारी आहे. दरम्यान, गेल्या वर्षी, भारतात, सुमारे 38.74 अब्ज UPI व्यवहार झाले, अशी एकआकडेवारी नुकतीच पुढे आली आहे. त्यामुळे भविष्यात UPI QR Codes सेवा युरोपमध्ये मिळणेही अधिक गरजेचे असल्याचे अधोरेखीत झाले आहे.