Twitter Web App वर आता शेड्युल करता येणार ट्वीट, नवं अपडेट लवकरच होणार रोलआऊट
Twitter logo (Photo courtesy: Twitter)

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्वीटवर (Twitter) आता ट्वीट शेड्युल करण्यासाठी ट्वीटडेकचा वापर केला जातो. त्यानुसार ट्वीटडेकवर युजर्सला कोणत्याही वेळी एखादे ट्वीट वेळ आणि तारखेनुसार शेड्युल करता येते. मात्र अद्याप हे फिचर मुख्य ट्वीटरसाठी लागू करण्यात आले नाही. पण आता शेड्युल ट्वीट करण्यात येणारे फिचर बाबत टेस्टिंग सुरु आहे. कंपनी या फिचरच्या माध्यमातून युजर्सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्वीटरच्या या फिचरसाठी कंपनी कढून काम केले जात आहे. कंपनीकडून हे फिचर कधी रोलआऊट करणार याबद्दल महिती देण्यात आलेली नाही. ट्वीट शेड्युल करण्यासाठी ट्वीटरवर असे टाइप करुन बॉटम बार येथे तीन डॉटवर क्लिक करावे लागणार आहे. तेथे युजर्सला तारिख आणि वेळ पोस्ट करुन ट्वीट शेड्युल करता येणार आहे.

या फिचर सोबत अन्य एक फिचरचे सुद्धा टेस्टिंग सुरु आहे. त्यामध्ये डायरेक्ट मेसेज इनबॉक्स मधून स्पॅम आणि अपमानजनक मेसेज स्वत:हून फिल्टर केले जाणार आहेत. सध्या युजर्सला कोणत्याही व्यक्तीचा मेसेज रिसिव्ह करण्यासाठी त्यांच्या डीम इनबॉक्सला ओपन ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचसोबत आता लवकरच ट्वीटर   युजर्सला Retweets हा ऑप्शन बंद करण्याची शक्यता आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर लवकरच एक छळवणूक विरोधी फिचर्स (Anti-Harassment Features) युजर्सच्या सेवेत दाखल करण्याची शक्यता आहे. हे फिचर लॉन्च झाल्यावर ट्विटरवर रिट्विट आणि दुसऱ्या यूजर्सला मेंन्शन करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली जाणार आहे.

(Twitter Account हॅक झाल्यास काय कराल? जाणून घ्या काही सोप्या स्टेप्स)

तर नुकत्याच ट्वीटरवर जगातील राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. ट्वीटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी काही जाहिरांतींवर बंदी घालण्यात येणार असल्याचा निर्णय स्पष्ट केला होता. त्यामुळे आता कंपनीने अधिकृतरित्या राजकिय जाहिरातींवर चाप बसवला आहे.