स्मार्टफोन झटपट चार्ज होण्यासाठी खास '4' टिप्स !
प्रतिकात्मक फोटो (Photo: pixabay)

तरुणाईला स्मार्टफोनचे वेडं आहे, ही थोरामोठ्यांची ओरड काही प्रमाणात खरीच आहे. कारण आपल्याला फोन सतत वापरायचा असतो. तो चार्ज होईपर्यंत देखील आपल्याकडे उसंत नसते. फोन अगदी झटपट चार्ज व्हावा, असे आपल्याला वाटते. पण अनेकदा स्मार्टफोन अगदी सावकाश चार्ज होतोय, असे तुम्हालाही जाणवते का? मग या काही खास टिप्स स्मार्टफोन फास्ट चार्ज होण्यासाठी....

ओरिजिनल चार्जरने करा चार्जिंग

अनेकदा आपण आपला स्मार्टफोन कोणत्याही चार्जरने चार्ज करतो. तुम्हीही असे करत असाल तर असे करणे टाळा. स्मार्टफोन चार्ज करण्यापूर्वी चार्जरचा एम्पिअर आणि वोल्ट चेक करा. कारण एम्पिअर आणि वोल्ट योग्य नसल्यास फोन खूप स्लो चार्ज होतो. त्याचबरोबर बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.

लॅपटॉप आणि पीसीने चार्ज करु नका

अनेकदा आपण आपला फोन लॅपटॉप किंवा पीसीने चार्ज करतो. पण जर तुम्हाला फोन फास्ट चार्ज करायचा असल्यास वॉल आऊटलेट (चार्जिंग पॉईंट) वरुन चार्ज करा.

फास्ट चार्जरचा वापर

स्मार्टफोन लवकर चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जरचा वापर करा. तुमचा फोन सपोर्ट करत असल्यास तुम्ही चार्जरचे एम्पिअर आणि वोल्ट वाढवू शकता.

बॅटरी आणि कॅपिसिटीनुसार निवडा पावरबॅंक

काही स्मार्टफोन्सची बॅटरी अतिशय पावरफुल असते. असे स्मार्टफोन्स चार्ज करण्यासाठी 10,000 एमएएच क्षमता असलेल्या पावर बँकचा वापर करा.