TikTok वर भारतामधील युजर्ससाठी कंपनीने लॉन्च केले सेफ्टी फिचर, वाईट कमेंट्स रोखता येणार
TikTok App (Photo Credits- Twitter)

सध्या सोशल मीडियावरील टिक टॉक अॅप (TikTok App) सध्या तरुणांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. तर कंपनीने चीन (China) आणि अमेरिका (America) येथे काही सिक्युरिटी फिचर्स लॉन्च केले आहे. तर आता भारतातसुद्धा हे फिचर लॉन्च करणार असून लोकल व्हर्जन जारी केले आहे. तसेच कंपनीने भारतात (India) त्यांचे 10 भाषांमध्ये सेफ्टी सेंटर सुरु केले आहेत.

भारतीय भाषांच्या व्यतिरिक्त यामध्ये एंटी बुलिंगचे दोन नवे पेज टॅग केले आहेत. त्याचसोबत एक लोकल वेबसाईट सुरु करण्यात आली असून त्यामध्ये सेफ्टी पॉलिसी आणि टूल्स यांसारखे ऑप्शनबद्दल अधिक माहिती दिली आहे. तसेच भारतीय तरुणांना त्यांचे बोलीभाषेतून या सेफ्टी फिचर बद्दल माहिती मिळणार असून अॅप वरील व्हिडिओवर करण्यात येणाऱ्या घाणेरड्या कमेंट्स रोखता येणार आहेत.(हेही वाचा-TikTok App वरील युजर्सचे अकाऊंट 'या' कारणामुळे डिलिट होतायत)

तर काही दिवसांपूर्वी कंपनीने फिल्टर फिचर सुद्धा अॅपमध्ये सुरु केले आहे. त्यामधून हिंसा आणि आपत्तीजनक व्हिडिओ आणि कमेंट्सवर चाप घालता येणार आहे.