TikTok App वरील युजर्सचे अकाऊंट 'या' कारणामुळे डिलिट होतायत (Photo Credits-Facebook)

चीनी (China) पद्धतीचे व्हिडिओ शेअरिंग अॅप TikTok ला गेल्या एका वर्षात खुप प्रसिद्धी मिळाली. एका वर्षापूर्वी लॉन्च झालेल्या या अॅपचे जगभरातून जवळजवळ 100 करोड पेक्षा जास्त युजर्स आहेत. मात्र सध्या टिक टॉक या अॅपवर चाईल्ड पोनोग्राफी आणि अन्य वादग्रस्त गोष्टी दाखवत असल्याचा आरोप लावला जात आहे.

या गोष्टीमुळे अॅपने काही युजर्सचे अकाऊंट आणि काही व्हिडिओ डिलिट करण्यास सुरुवात केली आहे. द वर्ज यांच्या रिपोर्टनुसार, टिक टॉक अॅपच्या काही युजर्सचा असा दावा आहे की, त्यांचे अकाऊंट बंदच करुन टाकले आहेत. तर काही युजर्सने सांगितले की, त्यांच्या अकाऊंटवरील व्हिडिओ डिलिट करण्यात आले आहेत.मात्र कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय अकाऊंट बंद किंवा व्हिडिओ डिलिट करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, अॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे 13 वर्षाखालील मुलांचे टिक टॉक अॅप बंद केले जात आहेत. अॅप युजर्सना त्यांच्या वयाची ओळख दाखवण्यासाठी सांगितले आहे. कंपनीने हा निर्णय एफटीसी सेटलमेंट अॅग्रिमेंटच्या अनुसार घेतला आहे. त्यामुळे 13 वर्षाखालील मुलांना हे अॅप किंवा वेबसाईटचा वापर करण्यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक केले आहे.(हेही वाचा-'व्हॉट्सअ‍ॅप' वर Group Invitation Control Feature अधिकृतरित्या लॉन्च होण्यापूर्वीच Android Beta वर खुलं)

या पॉलिसीला लागू केल्यानंतर टिक टॉकवरील काही प्रसिद्ध अकाऊंटही बंद करण्यात आले आहेत. त्याचसोबत व्हिडिओ ही डिलिट करण्यात आले आहेत. ज्या मुलांचे वय 13 वर्षाखाली आहे. अॅपद्वारे सांगण्यात आलेल्या नियमानुसार .युजर्सला आपले वय किती आहे याचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले आहे. ही पॉलिसी सध्या अॅपने अमेरिकेत सुरु केली असून लवकरच भारतातही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.