भारतात TikTok बॅन केल्यानंतर Moj व्हिडिओ अ‍ॅप लोकप्रिय, 10 लाखांपेक्षा अधिक युजर्सने केले डाऊनलोड
Moj App (Photo Credits- Twitter)

भारत सरकाने 29 जून रोजी चीनी अॅपवर बंदी घालण्यात आली. त्यामध्ये शॉर्ट व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या TikTok चा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे भारतात टिकटॉरवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु टिकटॉक जरी भारतात बॅन केले असले तरीही ShareChat यांनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म Moj अॅप लॉन्च केला आहे. तब्बल 1 मिलिनयपेक्षा अधिक युजर्सने हा व्हिडिओ अॅप डाऊनलोड केला आहे. तसेच Google Play Store येथून सुद्धा 10 लाखांहून अधिक युजर्सने तो डाऊनलोड केला आहे. हा अॅप लॉन्च केल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आतमध्ये 50 हजारांहून अधिक जणांनी तो डाऊनलोड केला होता. भारतात सरकारने टिकटॉकसह अन्य 50 अॅप बॅन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामध्ये बहुतांश चीनी अॅपचा समावेश होता.(Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge: पीएम नरेंद्र मोदी यांनी दिले Made in India Apps तयार करण्यासाठी खास चॅलेंज; मिळणार 20 लाख रुपयांचे बक्षीस)

टिकटॉक भारतात बॅन केल्यानंतर Roposo, Bolo Indya, CHingari, Mirton आणि Moj सारखे अॅप युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचसोबत Zee5 ने सुद्धा शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप HiPi लवकरच घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. टिकटॉकसह Likee नावाचे अॅप सुद्धा बॅन केले आहे. त्यामुळे युजर्स आता स्वदेशी अॅप डाऊनलोड करुन आपली कला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत आहेत.(टिकटॉकला टक्कर देणाऱ्या चिंगारी अॅपला युजर्सचा तुफान प्रतिसाद; गुगल प्ले स्टोअरवर तब्बल 10 लाख डाऊनलोड्स)

शेअर चॅट यांनी डेव्हलप केलेला शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप Moj हा 15 भारतीय भाषांमध्ये येणार आहे. यामध्ये हिंदी, बंगाली. गुजराती, कन्नड आणि पंजाबी सारख्या स्थानिक भाषा यांचा समावेश आहे. टिकटॉक प्रमाणेच यामध्ये सुद्धा युजर्सला शॉर्ट व्हिडिओ तयार करता येणार आहे. 15 सेकंदाचा व्हिडिओ युजर्सला बनवण्यासोबत तो व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर सुद्धा शेअर करता येणार आहे. Moj मध्ये डान्स, कॉमेडी, Vlog, फूड, DIY, मनोरंजन, न्यूज, फनी व्हिडिओ, गाणी यासारखे कंन्टेंटचा समावेश करण्यात आला आहे.