
सोनी इंडियाने हाय जूम सायबर शॉट लाईनचा विस्तार करत डिएससी डब्ल्यूएक्स 800 हा नवाकोरा कॅमेरा लॉन्च केला. 29 ऑक्टोबरपासून हा विक्रीसाठी उपलब्ध होईल. डिएससी डब्ल्यूएक्स 800 ची किंमत 34,990 रुपये आहे. हा जगातील सर्वात लहान बॉडी असलेला कॅमेरा आहे, असा दावा कंपनीने केला आहे. याची झूम रेंज 24 एमएम ते 720 एमएम इतकी आहे. यात सुपर टेलीफोटो लेन्स लावण्यात आली आहे.
कंपनीनुसार, यात बॉयोन्ज एक्स इमेज प्रोसेसिंग इंजिनसोबत फ्रंट एंड एलएसआय देण्यात आले आहे. जे हाय स्पीड कंटीन्यूअस शूटिंग 10 फ्रेम प्रति सेकंदच्या स्पीडने काम करतो. याची बफर लिमीट 155 फोटोंची आहे. यात 180 डिग्री टिल्टेबल एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामुळे सेल्फी काढणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर कनेक्टीव्हीटीसाठी ब्लूटुथ देण्यात आलं आहे. भारतीय बाजारात हा कॅमेरा सोनी सेंटर्स, अल्फा फ्लॅगशिप स्टोर आणि प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स स्टोर्सवर उपलब्ध होईल.