21 जून, रविवारी भारतासह उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात लांब दिवस (Longest Daytime) असेल. यादिवशी सूर्य आकाशातील सर्वोच्च स्थान गाठेल आणि या दिवशी वर्षातील सर्वात जास्त वेळ सूर्यप्रकाश अनुभवता येईल. तर असा हा वर्षातील सर्वात मोठा दिवस, इंग्लंडच्या स्टोनहेंज (Stonehenge) येथे अनुभवण्यासाठी जगभरातील लोक गर्दी करतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर या ठिकाणी प्रत्यक्षात लोकांना जाणे शक्य नाही. मात्र इंग्लंडच्या या सुंदर, प्रागैतिहासिक कालखंडातील शिल्पा जवळील सूर्यास्त व सूर्योदयाचा अनुभव तुम्ही व्हर्चुअल (Virtual) पद्धतीने घेऊ शकाल. तर आज आम्ही सांगत आहोत हा समर सॉलिस्टीस 2020 (Summer Solstice 2020) स्टोनहेंज येथून, आपण थेट लाईव्ह कसा पाहू शकाल.
आम्ही आपल्यासाठी घरातून ऑनलाइन ही घटना पाहण्यासाठी, 21 जूनच्या समर सॉल्स्टीसच्या फेसबुक व्हर्च्युअल इव्हेंटची लिंक शेअर करत आहोत. दरवर्षी या दिवशी स्टोनहेंज जगभरातील लोकांचे स्वागत करते. रिंग स्टँडिंग दगडांवरील वर्षातील सर्वात लांब दिवशीचा सुंदर सूर्योदय पाहण्यासाठी, इंग्लंडच्या विल्शायर (Wilshire) येथे लोक रात्रीपासूनच गर्दी करतात. यासह जगातील इतरही अनेक ठिकाणी लोक ही घटना पाहण्यासाठी एकत्र येतात. मात्र सध्याच्या महामारीच्या काळात सामाजिक आंतर ठेवणे गरजेचे असल्याने, स्टोनहेंज हा कार्यक्रम व्हर्चुअली जगभरातील लोकांना दाखवत आहे. (हेही वाचा: भारतीय वेळेनुसार उद्या सूर्यग्रहण कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या)
द इंग्लंड हेरिटेज ऑर्गनायझेशन आपल्या फेसबुक पेजद्वारे लोकांना या घटनेचा आनंद देत आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग शनिवार 20 जून रोजी रात्री 9: 26 वाजता सुरू होईल आणि 21 जून रोजी सूर्योदय होईपर्यंत पहाटे 4:52 पर्यंत चालेल. या इव्हेंटबाबत फेसबुकवर माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, 'आम्ही प्रत्यक्षरित्या लोकांना इथे येण्याची परवानगी देऊ शकत नाही, मात्र लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे तुम्ही इथला सूर्योदय व सूर्यास्त अनभवू शकता.' दरम्यान, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. तर काही देशांत उन्हाळा सुरु होतो. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस 13 तास 13 मिनिटांचा असतो, त्यामुळे 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.