Humanoid Robot | (Photo Credits: YouTube)

Humanoid Robot Video: औद्योगीकरण आणि माहिती तंत्रज्ञानात प्रगती झाल्यापासून अनेक क्षेत्रांतून मानुष्यबळ मोठ्या प्रमाणावर हद्दपार होत आहे. आता तर रोबट आल्यामुळे अगदी कुशल आणि बारिकीने कराव्या लागणाऱ्या कौशल्यपूर्ण गोष्टींतूनही मनुष्यबळाची पिछेहाट होत आहे. एका दृष्टीने हे सकारात्मक असले तरी,महागाई आणि बेकारी यांचा मेळ घालता भविष्यात नवे प्रश्न जन्म घेतील हा भाग वेगळा. मानवी कौशल्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण करेल अशा एका रोबटचा व्हिडिओ (Viral Video) इंटरनेटवर चांगलाच चर्चेते आहे. एक असा रोबोट जो मानवाप्रमाणे धावू, चालू आणि कोलांट्याउड्याही मारू शकतो. इतकेच नव्हे तर मानवाप्रमाणे इतरही कृती तो करु शकतो. व्हिडिओ पाहून आपण याची खात्री करु शकता.

बोस्टन डायनॅमिक्स या अमेरिकन अभियांत्रिकी आणि रोबोटिक्स कंपनीने बनवलेला हा रोबोट त्यांच्या ह्युमनॉइड रोबोटचा एक नवीन प्रोटोटाइप आहे जो मानवाप्रमाणे कार्य करू शकतो. या रोबोटचे नुकतेच अनावरण झाले. कंपनीने कंपनीच्या युट्यूब चॅनलवर या रोबोटचा व्हिडओ डेमो रुपात अपलोड केला आहे. (हेही वाचा, Robot Judge: ऐकावे ते नवलच! China ने बनवला जगातील पहिला 'रोबोट जज'; 97 टक्के अचूक निर्णय घेण्याची क्षमता)

कंपीने रोबटबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, अ‍ॅटलाससाठी (रोबोट) कौशल्य विकसीतक करण्याची आणि त्यासाठी एक एक नवीन निकष निवडण्याची वेळ आली आहे. या व्हिडिओमध्ये, ह्युमनॉइड रोबोट त्याच्या सभोवतालची परिस्थीती हाताळतो. तो वस्तूंशी संवाद साधतो आणि त्याचे काम करण्यासाठी तो स्वत:मध्ये आवश्यक बदलही करतो. अर्थात त्याला काही मर्यादाही आहेत.

व्हिडिओ

व्हिडिओमध्ये पाहायाल मिळते की, हा दोन पायांचा रोबोट बराच चपळ आहे. त्याच्याकडे अनेक कौशल्ये असल्याचे तो कृतीतून दाखवतो. तो बांधकाम साइटवर कामगारांना मदतानाही प्राथिनीधीक रुपात दिसतो. व्हिडीओमध्ये, रोबोट एका कामगाराला मदत करताना धावणे, उडी मारताना, वस्तू पकडताना आणि फेकताना दिसतो. याशवाय तो इतरही कामे करताना दिसत आहे. फळ्या फेकण्यापासून, आणि पायऱ्या चढण्यापासून, डोक्यावर पिशवी हलक्या हाताने संतुलित ठेवण्यापर्यंत, तो आपला वेग आणि ऍथलेटिक क्षमता दाखवतो. सर्व कामे पूर्ण केल्यानंतर हा रोबोट मस्तपैकी कोलांटीउडी मारतानाही दिसतो.