How to Watch Strawberry Moon Eclipse Live Streaming Online in India: आज घरबसल्या छायाकल्प चंद्रग्रहण कधी आणि कुठे पाहू शकाल?
Lunar eclipse live streaming (Photo Credits: Pixabay)

Chandra Grahan Online Streaming:  आज 5 जून, वटपौर्णिमा, पर्यावरण दिन यासोबतच चंद्रग्रहणाचा आनंदही खगोलप्रेमींना लुटता येणार आहे. 5 आणि 6 जूनच्या रात्री भारतासह युरोप, अमेरिका, आफ्रिकेमध्ये आज मध्यरात्री छायाकल्प चंद्रग्रहण (Chandra Grahan) पाहता येणार आहे. तुम्हांला खगोलीय घटनांचं अप्रुप असेल तर आज नक्कीच तुमच्यासाठी खास दिवस आहे. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते, त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण होते. आजच्या चंद्राला Strawberry Moon असं देखील संबोधलं जातं आहे.

भारतीय वेळेनुसार आज रात्री 11.15 पासून 6 जूनच्या पहाटे 2.34 पर्यंत चंद्रग्रहण होणार आहे. दरम्यान या चंद्रग्रहणामध्ये 12.54 वाजता ग्रहणाचा सर्वोच्च काळ असेल. त्यामुळे आजच्या रात्री तुम्हांला चंद्रग्रहण पाहण्याची इच्छा असेल तर पूर्ण काळजी घेऊन या ग्रहणाचा आनंद लुटायला विसरू नका. ऑनलाईन देखील तुम्हांला हे चंद्रग्रहण पाहता येऊ शकतं. 5 जून ते 5 जुलै दरम्यान येणार वर्षातील 3 ग्रहणं; जाणून घ्या तारीख आणि वेळ.

छायाकल्प चंद्रग्रहण तुम्हांला लाईव्ह कुठे पाहता येऊ शकतं?

ढगाळ वातावरण आणि त्यामध्ये छायाकल्प चंद्रग्रहण असल्याने चंद्र थोडा धुसर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे थेट हे चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता कमी आहे. मग अशावेळेस चंद्रग्रहण पाहण्यासाठी तुम्हांला काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. Slooh, Virtual Telescope Project आज तुम्हांला घरबसल्या चंद्रग्रहणाचं लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहे.

भारतीय समाजात आज 21 व्या शतकामध्येही ग्रहण या भौगोलिय घटनेबाबत अनेक समज गैरसमज आहेत. मात्र तुम्ही खगोलप्रेमी असाल तर हे सारे समज गैरसमज दूर सारून तुम्हांला या घटनेचा आनंद घेता येऊ शकतो. केवळ आरोग्याच्या दृष्टीने थेट उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहणं चूकीचं आणि डोळ्यांसाठी अपायकारक असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन तुम्ही नक्किच चंद्रग्रहण बघू शकता.

दरम्यान आज चंद्रग्रहणासोबत Strawberry Moon हा योगायोगदेखील जुळून आला आहे. आजचा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र हा गुलाबी किंवा स्टॉबेरी रंगामुळे नव्हे तर जुन्या ट्राईब्समुळे ओळखला जाणार आहे. जून महिना हा स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी महत्त्वाचा होता. त्याच गणित चंद्राच्या कलेनुसार होत असे. त्यामुळे तसेच त्याचं नामकरण झालं.