Moon | Photo Credits: ISRO

इस्त्रोच्या (ISRO) चांद्रमोहिमेतील चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरने चंद्राचे काही नवे फोटो पाठवले आहेत. Orbiter High Resolution Camera च्या माध्यमातून चंद्राचे हे खास फोटो टिपण्यात आले आहेत. OHRC instrument द्वारा चंद्राच्या पृष्ठभागाचा अगदी जवळून दृश्य पाहता येत आहे. चंद्रयान 2 पुढील साडेसात वर्षे चंद्राची परिक्रमा करत राहणार आहे. चंद्रावर झेपावलेल्या विक्रम लॅन्डरचा शोध घेण्यास NASA असमर्थ, वैज्ञानिक ऑक्टोंबर महिन्यात पुन्हा प्रयत्न करणार.

7 सप्टेंबर 2019 दिवशी चंद्रयान 2 चे विक्रम लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर स्मूथ लॅन्डिंग करणं अपेक्षित होते मात्र विक्रम लॅन्डरचे हार्ड लॅन्डिंग झाल्याने त्याच्याशी संपर्क तुटला आहे. मात्र ऑर्बिटर अजूनही काम करत असल्याने त्याच्याद्वारा काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. काल (4 ऑक्टोबर) रात्री उशिरा इस्त्रोने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

ISRO Tweet 

काही दिवसांपूर्वी ऑर्बिटरनेच पाठवलेल्या काही फोटोंच्या मदतीने विक्रम लॅन्डरचा पत्ता लागला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भागाचा अभ्यास करण्यासाठी ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर एकत्र पाठवण्यात आले होते. विक्रम लॅन्डरसोबत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.