20 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार फोल्डेबल Galaxy F स्मार्टफोन
20 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार फोल्डेबल Galaxy F स्मार्टफोन (Photo Credits-Twitter)

साऊथ कोरियन (South Korean) टेक कंपनी सॅमसंग (Samsung) येत्या 20 फेब्रुवारी रोजी Unpacked कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. दरम्यान कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यावेळी Galaxy S10, S10 Pluse आणि S10e लॉन्च करण्याची शक्यता आहे. तसेच Galaxy Watch Active आणि Galaxy Buds सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

रिपोर्टनुसार, एनपॅक्ड 2019 कार्यक्रमावेळी सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन,Galaxy Fold लॉन्च करणार आहे. याबाबत मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटवर ट्विटरवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टखाली असे लिहिण्यात आले आहे की, मोबाईचे भविष्य 20 फेब्रुवारी 2019 रोजी अनफोल्ड होणार आहे.

सॅमसंग कंपनीने गेल्या वर्षी फोल्डेबल स्मार्टफोनचा फर्स्ट लूक झळकवला होता. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात आली नाही आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळजवळ 1,800 डॉलर म्हणजेच 1,28,000 रुपये असण्याची शक्यता आहे, तर इंटरनल मेमरी 512GB असणार आहे.