सॅमसंग (Samsung) कंपनी आपला नवा स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये काही गोष्टींमुळे खास असणार आहे. हा पहिला इन-डिस्प्ले कॅमेरा असणारा फोल्डिंग स्मार्टफोन असणार आहे. त्याचसोबत भारतात लॉन्च होणारा पहिलाच इन-डिस्प्ले कॅमेरा फोन असेल. Samsung Galaxy Z सीरिजच्या फोल्डिंग स्मार्टफोनला पुढील महिन्यात लॉन्च केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ग्लोबल लॉन्चिंगसह भारतात तो स्वतंत्रपणे लॉन्च केला जाणार की नाही याबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही.
साउथ कोरियन पब्लिकेशन Ddaily च्या रिपोर्ट्नुसार फोन 11 ऑगस्टच्या संध्याकाळी 7.30 वाजता लॉन्च होणार आहे. या दिवशी नवा फोल्डिंग फोन Galaxy Z Fold आणि Z Flip सुद्धा लॉन्च केला जाऊ शकतो.त्याचसोबत गॅलेक्सी Watch 4 सीरिज आणि Galaxy Buds 2 सु्द्धा उतरवले जाऊ शकतात.(Myntra च्या End Of Reason Sale ला सुरुवात, ग्राहकांना सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट)
लीक रिपोर्ट्सनुसार, गॅलेक्सी झेड फोल्ड 3 स्मार्टफोनमध्ये एक स्पेशल S Pen दिला जाऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला एक बटण मिळू शकते. फोनच्या रियर पॅनलवर एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. या व्यतिरिक्त कॅमेऱ्यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध नाही आहे. Samsung Galaxy Z Fold 3 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेट सपोर्टसह उतरवला जाऊ शकतो. जो Qualcomm चा आतापर्यंतचा सर्वाधिक पॉवरफुल प्रोसेसर आहे.
पॉवरबॅकअपसाठी फोनमध्ये एक 4275mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. काही रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, फोन वायरलेस चार्जिंग सपोर्टसह उतरवला जाऊ शकतो. मात्र अधिकृतरित्या याबद्दल सांगण्यात आलेले नाही. फोन लाइटर फ्रेम, थिनर बेजेल्स आणि एक अंडर डिस्प्ले फ्रंट कॅमेरा सपोर्टसह उतरवला जाऊ शकतो. गॅलेक्सी झेड फ्लिप 3 मध्ये एक ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. डिवाइस ड्युअल टोन फिनिशमध्ये येणार आहे.