सॅमसंग इंडियाने (Samsung India) गॅलेक्सी एफ12 (Galaxy F12 ) आणि गॅलेक्सी एम12 (Galaxy M12) या दोन स्मार्टफोन्सच्या (Smartphones) किंमतीत वाढ केली आहे. 91 Mobiles च्या रिपोर्टनुसार, या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कालपासून (मंगळवार, 7 सप्टेंबर) नवीन किंमती लागू झाल्या असून ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (Offline) हे स्मार्टफोन्स नव्या किंमतीत (New Prices) मिळत आहेत.
Samsung Galaxy M12 फोनचा 4GB+64GB वेरिएंट 10,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र ता याची किंमत 11,499 रुपये इतकी झाली आहे. तर Samsung Galaxy F12 चा 4GB + 64GB वेरिएंट 11,499 रुपयांना उपलब्ध असून 4GB+128GB वेरिएंट 12,499 रुपयांना उपलब्ध असेल. (Amazon वर Samsung Galaxy M12 स्मार्टफोनची जबरदस्त विक्री, बनवला रेकॉर्ड)
Galaxy F12 आणि Galaxy M12 ची डिझाईन आणि हार्डवेअर साधारपणे सारखंच आहे. यात 6.5 इंचाचा एचडी+एलसीडी डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये Exynos 850 प्रोसेसर 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Galaxy F12 आणि Galaxy M12 या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 48MP चा कॅमेरा, 5MP चा अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स आणि दोन 2MP चे सेन्सर्स देण्यात आले आहेत. 8MP चा सेल्फी शूटर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6000mAh ची बॅटरी15W फास्ट चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. हे स्मार्टफोन्स अॅनरॉईड 11 वर आधारित OneUI 3.1 OS वर काम करतात.