Samsung Galaxy Chromebook 2 (Photo Credits: Twitter)

टेक्नोलॉजी जगतातील लोकप्रिय कंपनी सॅमसंग (Samsung) आपल्या गॅजेट्सच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना खूश करत असते. त्यात आता लवकरच ही कंपनी Samsung Galaxy Chromebook 2 लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा मागील वर्षी लाँच झालेल्या Galaxy Chromebook चे अपडेटेड व्हर्जन असेल. या क्रोमबुकची खासियत म्हणजे यात QLED डिस्प्ले असेल. ज्यामुळे या क्रोमबुकचे (CHromebook) डिझाईन खूपच पातळ आणि आकर्षक असेल. सॅमसंग CES 2021 इव्हेंटमध्ये हा क्रोमबुक लाँच करणार आहे.

Samsung Galaxy Chromebook 2 ची किंमत 549.99 डॉलर (जवळपास 40,300 रुपये) इतकी असेल. हा क्रोमबुक Stylus सपोर्टसह लाँच केला जाईल. हा क्रोमबुक लाल आणि करड्या अशा दोन रंगात उपलब्ध होईल.हेदेखील वाचा- Samsung Galaxy S21 सीरिज 'या' दिवशी होणार लाँच, कुठे पाहता येईल हा लाईव्ह इव्हेंट

याच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 13.3 इंचाची फुल HD QLED डिस्प्ले दिली असेल. यात डिस्प्ले टच सुद्धा देण्यात आला आहे. हा क्रोमबुक Intel Celeron 5205U वा 10th-generation Intel Core i3-10110U प्रोसेसरसह लाँच केला जाईल. यात Intel UHD Graphics आणि 8GB LPDDR3 रॅमसह लाँच केला आहे. हा क्रोमबुक 64GB आणि 128GB स्टोरेजसह देण्यात आला आहे. या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डसह दिला जाऊ शकतो.

सॅमसंगच्या या क्रोमुबकला 5W स्टिरियो स्पीकरसह Smart AMP साउंडसह लाँच सादर करण्यात येईल. यात 720p चा वेबकॅमसुद्धा असेल. यात बॅकलिट, लैटिस की-बोर्डसुद्धा दिला आहे. तसेच 45.5WHr ची बॅटरी दिली जाऊ शकते. यात कनेक्टिव्हिटीसाठी USB Type C पोर्ट, हेडफोन वा मायक्रोफोन साठी कॉम्बो जॅक, Wi-Fi 6 आणि ब्लूटुथ v5.0 दिला जाऊ शकतो.

दरम्यान सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy S21 याची लाँचिंग डेट अखेर समोर आली आहे. येत्या 14 जानेवारीला हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार असून हा ग्लोबल लाँच इव्हेंट असणार आहे.