सॅमसंग कंपनी आपल्या ग्राहकांना नेहमी काही ना काहीतरी नवीन गोष्टी देण्याच्या प्रयत्नात असते. त्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy S21 याची लाँचिंग डेट अखेर समोर आली आहे. येत्या 14 जानेवारीला हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार असून हा ग्लोबल लाँच इव्हेंट असणार आहे. सॅमसंगने नुकतेच सोशल मिडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. 14 जानेवारीला सकाळी 10 वाजता (भारत वेळेनुसार, संध्याकाळी 8.30 वाजता) याचा व्हर्च्युअल इव्हेंट आयोजित केला जाईल. त्यासाठी सॅमसंगने याच्याशी संबंधित लिंक शेअर करुन येथे तुम्हाला हा लाईव्ह पाहता येईल असे सांगितले आहे.
Samsung Galaxy S21 सीरिजमध्ये खूप आकर्षक वैशिष्ट्ये पाहायला मिळणार आहे. Galaxy Unpacked Event 2021 लाईव्ह पाहण्यासाठी Samsung ने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलची लिंक शेअर केली आहे. या इव्हेंटमध्ये Galaxy S21, Galaxy S21 Plus और Galaxy S21 Ultra अशी सीरिज लाँच केली जाईल.हेदेखील वाचा- Xiaomi चा 108MP चा कॅमेरा असलेला Mi 10i 5G स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, काय असू शकते किंमत?
या सीरिजमध्ये डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी लाईफ, परफॉर्मन्स सर्व काही अपग्रेड केलेले असेल. याशिवाय यात S-Pen सुद्धा दिला आहे. यातील Galaxy S21 आणि S21 Plus विषयी बोलायचे झाले तर, Galaxy S21 मध्ये 6.2 इंचाची डायनॅमिक अमोल्ड 2x डिस्प्ले असू शकते. तर S21 Plus मध्ये 6.7 इंचाची डिस्प्ले असू शकते. या दोन्ही मॉडलमध्ये 120Hz रिफ्रेश रेटअसणारे पॅनल दिले जाऊ शकते. यात S21 आणि S21 Plus च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, या दोघांमध्ये 10MP चा सेल्फी कॅमेरा असू शकत. तर मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनचे प्रायमरी सेंसर 12MP चे असू शकते. S21 मध्ये 4000mAh ची बॅटरी असू शकते. तर S21 Plus मध्ये 4800mAh ची बॅटरी असू शकते.
Samsung Galaxy S21 Ultra मध्ये 6.8 इंचाची WQHD+ डिस्प्ले असू शकते. तसेच यात मागील बाजूस 108MP चा प्रायमरी कॅमेरा सेंसर असू शकतो. त्याशिवाय फोनमध्ये 10MP आणि 12MP असे दोन कॅमेरे असू शकतात. सेल्फीसाठी या फोनमध्ये 40MP चा कॅमेरा असू शकते.
एकंदरीत या जबरदस्त वैशिष्ट्ये पाहून सर्वच चाहते सॅमंसग गॅलेक्सी S21 च्या या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.