फ्रेंच उद्योगपती आणि लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नोल्ट (Bernard Arnault) आता पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून एक्सचे (X) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांना जोरदार धक्का दिला आहे. टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे एलॉन मस्क यांना फटका बसला असून त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. तर बर्नार्ड अर्नोल्टची एकूण संपत्ती सुमारे 207.6 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. इलॉन मस्कची एकूण संपत्ती आता 204.7 अब्ज डॉलर आहे. (हेही वाचा - Binny Bansal Resigns From Flipkart: फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांचा राजीनामा; नवीन E-com व्यवसाय सुरू करणार)
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे नाव फोर्ब्सच्या रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत 11 व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 104.4 अब्ज डॉलर्स आहे. तर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी या यादीत 16 व्या स्थानावर आहेत. त्याच्याकडे एकूण 75.7 डॉलर्स बिलियन आहे. 23 जानेवारीला मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2.24 अब्ज डॉलर्स म्हणजेच 18,630 कोटी रुपयांची घट झाली होती. त्यामुळं मुकेश अंबानी यांची संपत्ती 99.1 बिलियन डॉलरवर पोहोचली होती. तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत 3.38 अब्ज डॉलर म्हणजेच 28,111 कोटी रुपयांची घट झाल्याने त्यांची एकूण संपत्ती ही 90.8 बिलियन डॉलरवर पोहोचली होती.
बर्नार्ड अर्नोल्ट आणि एलॉन मस्क यांच्यानंतर या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 181.30 अब्ज डॉलर्स आहे. लॅरी एलिसनचे नाव चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 142.20 अब्ज डॉलर्स आहे. 139.1 अब्ज डॉलर्ससंपत्तीसह, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग या यादीत पाचव्या स्थानावर आहे. यानंतर वॉरन बफेट, लॅरी पेज, बिल गेट्स, सर्जे ब्रिन आणि स्टीव्ह बाल्मर यांच्या नावाचाही जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.