रिलायन्स जिओने (Reliance Jio) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवा प्लॅन (New Plan) सादर केला आहे. 1999 रुपयांचा हा प्लॅन असून यात ग्राहकांना कॉलिंग, डेटा आणि फोनही अगदी मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा केवळ काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी नसून चक्क दोन वर्षांसाठी आहे. म्हणजेच या प्लॅनअंतर्गत 730 दिवसांसाठी ग्राहकांना सर्वकाही फ्री मध्ये मिळणार आहे. यासोबत 1499 रुपयांचा प्लॅनही लॉन्च करण्यात आला आहे. यातही वर्षभरासाठी सर्वकाही मोफत मिळणार आहे. तर जाणून घेऊया या प्लॅन्सविषयी: (Reliance Jio च्या एका रिचार्ज प्लॅनसोबत दुसरा मोफत! जाणून घ्या Plan Details)
1999 रुपयांच्या प्लॅनमधील सुविधा:
# एकूण 48 जीबी डेटा.
# सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग.
# जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस.
# जिओफोन.
या प्लॅनची व्हॅलिडीटी 2 वर्षांची आहे.
1499 रुपयांच्या प्लॅनमधील सुविधा:
# एकूण 24 जीबी डेटा.
# सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग.
# जिओफोन.
या प्लॅनची व्हॅलिडीटी वर्षभराची आहे.
JioPhone कसा बुक कराल?
JioPhone बुक करण्यासाठी Jio.com या वेबसाईटला भेट द्या. तिथे JioPhone सेक्शनमध्ये तुम्हाला दोन प्लॅन दिसतील- 1999 रुपये आणि 1499 रुपये. तुम्हाला हवा तो प्लॅन घेण्यासाठी Book Now वर क्लिक करा. त्यानंतर नाव आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी जनरेट करा आणि फोन बुक करा. विशेष म्हणजे फोनच्या डिलिव्हरीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
जिओ फोन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नव्या युजर्ससाठी देखील हा प्लॅन फायदेशीर ठरु शकतो.