Reliance Jio च्या एका रिचार्ज प्लॅनसोबत दुसरा मोफत! जाणून घ्या Plan Details
Reliance Jio (Photo Credits: Wikimedia Commons)

आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी सातत्याने नवनवे प्लॅन्स सादर करणाऱ्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) आता एकावर एक फ्री रिचार्ज ऑफर सादर करत युजर्सची मनं जिकंली आहेत. जिओचे 185, 155, 125, 75, 69, 39 रुपये असे एकूण 6 रिचार्ज  प्लॅन्स आहेत. यापैकी कोणताही रिचार्ज प्लॅन तुम्ही खरेदी केल्यास त्याच किंमतीचा अजून एक रिचार्ज प्लॅन तुम्हाला अगदी मोफत मिळेल. तर जाणून घेऊया या 6 प्लॅन्सचे डिटेल्स म्हणेजच या प्लॅनमध्ये तुम्हाल नक्की कोणकोणत्या सुविधा मिळणार... (Reliance Jio 5G Launch 2021: मुकेश अंबानी यांची घोषणा; रिलायन्स जिओ 5G सेवा लॉन्च करणार)

185 रुपयांचा प्लॅन:

185 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळेल. अनलिमिडेट व्हाईस कॉलसह दिवसाला 100 एसएमएस मोफत मिळतील. याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. तसंच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउंड सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल. विशेष म्हणजे यासोबत याच किंमतीचा प्लॅन अगदी मोफत मिळणार आहे. त्यामुळे मिळणारे लाभ देखील वाढतील.

155 रुपयांचा प्लॅन:

185 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटासह अनलिमिडेट व्हाईस कॉल्स मोफत मिळतील. दिवसाला 100 एसएमएस मोफत मिळतील. याची व्हॅलिडिटी देखील 28 दिवसांची आहे. तसंच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउंड सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.

125 रुपयांचा प्लॅन:

या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी असून दर दिवशी  0.5 जीबी डेटा मिळेल. अनलिमिडेट व्हाईस कॉल्स आणि दिवसाला 300 एसएमएस मोफत दिले जातील. या प्लॅनमध्ये देखील जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउंड सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.

75 रुपयांचा प्लॅन:

28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये दिवसाला 0.1 जीबी डेटा+200 एमबी डेटा मोफत दिला जाईल. त्याचबरोबर अनलिमिडेट व्हाईस कॉल्स आणि दिवसाला 50 एसएमएस मोफत दिले जातील. जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउंड या अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.

69 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांची असून यात दिवसाला 0.5 जीबी डेटा मिळणार आहे. अनलिमिडेट व्हाईस कॉल्स मोफत दिले जातील आणि जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउंड या अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.

39 रुपयांचा प्लॅन:

14 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये दर दिवशी 100 एमबी डेटा मिळेल. अनलिमिडेट व्हाईस कॉल्स मोफत मिळतील. त्याचबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउंड या अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.

कोविड-19 संकटाच्या कठीण काळात ग्राहकांना दिलासा देण्याची मोठी घोषणा रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यानुसार एका रिचार्ज प्लॅनवर त्याच किंमतीचा अजून एक प्लॅन मोफत दिला जात आहे.