Reliance Jio (Photo Credit: Facebook)

रिलायन्स जिओने (Reliance Jio) 2019 मध्ये तब्बल 89.90 दशलक्ष (सुमारे 9 कोटी) नवीन वायरलेस ग्राहक जोडले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) 'Yearly Performance Indicators of Indian Telecom Sector' नावाने 2019 चा नवीन वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात टेलिकॉम प्रोव्हायडर्स ची ईयर-ऑन-ईयर सब्सक्राइबर्स वाढ आणि घट झाल्याची आकडेवारी दर्शविली आहे. एकीकडे रिलायन्स जिओने ग्राहकांच्या घवघवीत यश मिळवले आहे, तर दुसरीकडे व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) आणि एअरटेलने (Airtel) कोट्यावधी वायरलेस ग्राहक गमावले आहे. ट्रायच्या अहवालानुसार, 2019 मध्ये व्होडाफोन आयडियाचे 86.13 दशलक्ष ग्राहक आणि एअरटेलचे 12.96 दशलक्ष ग्राहक त्यांना सोडून गेले आहेत.

अहवालानुसार, रिलायन्स जिओचे एकूण वायरलेस ग्राहक डिसेंबर 2018 च्या तुलनेत, 280.12 दशलक्ष्यावरून डिसेंबर 2019 मध्ये 370.2 दशलक्ष झाले आहेत. रिलायन्स जिओ वायरलेस टेलिफोन ग्राहक बेसच्या बाबतीत 32.14 टक्के वाट्यासह सध्या मार्केटमध्ये अव्वल आहे. डिसेंबर 2018 मध्ये व्होडाफोन आयडियाचे ग्राहक 418.75 दशलक्ष होते, जे डिसेंबर 2019 मध्ये कमी होऊन  332.61 दशलक्ष झाले. यासह कंपनीचा बाजारातील हिस्सा 35.61 टक्क्यांवरून घसरून 28.89 टक्क्यांवर आला आहे.

एअरटेलनेही यावर्षी आपले ग्राहक गमावले पण वोडाफोन आयडियापेक्षा त्यांची स्थिती बरी आहे. कंपनीकडे डिसेंबर 2018 मध्ये 340.26 दशलक्ष ग्राहक होते, जे डिसेंबर 2018 मध्ये घसरून 327.30 दशलक्ष झाले. एअरटेलचा बाजारातील हिस्सादेखील 28.93 टक्क्यांवरून 28.43 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलकडे गेल्या वर्षी 3.74 दशलक्ष ग्राहक जोडले गेले होते. बीएसएनएलचे डिसेंबर 2018 मध्ये 114.37 दशलक्ष ग्राहक होते जे डिसेंबर 2019 मध्ये वाढून 118.12 दशलक्ष झाले. गेल्या वर्षाच्या शेवटी बीएसएनएलचा बाजारातील हिस्सा 10.26 टक्के होता. (हेही वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Motorola Moto G या महिन्यात होणार लाँच, 'या' दिवशी Flipkart होणार वर इव्हेंट)

ट्रायच्या अहवालानुसार, रिलायन्स जिओ (370.87 दशलक्ष), भारती एअरटेल (140.40 मिलियन), व्होडाफोन आयडिया (118.45 दशलक्ष), बीएसएनएल (23.96 दशलक्ष) आणि अ‍ॅट्रिया कन्व्हर्जेन्सी टेक्नोलॉजीज (1.52 दशलक्ष) हे वायर्ड आणि वायरलेससह ग्राहकांच्या बाबतीत टॉप 5 ब्रॉडबँड सेवा पुरवठादार आहेत.