रिलायन्स जिओ युजर्ससाठी खुशखबर, ग्राहकांना 'या' प्लॅनमध्ये Hotstar सह मिळणार 240GB पर्यंत डेटाची सुविधा
Jio (Photo Credits: IANS)

रिलायन्स जिओ (Relinace Jio) त्यांच्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवे ऑफर्स घेऊन येतात. ऐअरटेल कंपनीने जिओला टक्कर देण्यासाठी 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney+Hotstar VIP पॅकेज देत आहे. परंतु आता रिलायन्स जिओने त्यांचे नवे चार Hotstar Add On Packes लॉन्च केले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney+Hotstar डेटा अॅड-ऑन पॅक्ससह युजर्सला 240GB डेटा सुद्धा ऑफर करत आहे. रिलायन्स जिओने काही 6 नवे रिचार्ज पॅक लॉन्च केले आहेत. त्यामध्ये दोन वॉईस कॉलिंग बेनिफिट्स सुद्धा ऑफर करत आहे. उर्वरित चार पॅक हे डेटा अॅड ऑन आहेत. या पॅकमध्ये ग्राहकांना Disney+Hotsart चे सब्सक्रिप्शन दिले जात आहे. सध्या युजर्सला त्यांच्याकडे असलेल्या प्लॅनमध्ये अॅड ऑन पॅक मधून रिजार्च करता येणार आहे.

>>जिओचा 612 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 612 रुपयांच्या अॅड ऑन प्लॅन मध्ये ग्राहकांना वॉईस कॉलिंग बेनिफिट्स मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी युजर्सला FUP मिनिट्स देण्यात येणार आहे. नॉन-जिओ नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी यामध्ये 6000FUP मिनिटांसह 72GB अनलिमिटेड डेटा बेनिफिट सुद्धा ऑफर करण्यात येत आहे. या प्लॅनची वॅलिडिटी युजर्सकडे असलेल्या सध्याच्या प्लॅन ऐवढीच असणार आहे. मात्र युजर्सला एका वर्षासाठी Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.(BSNL ग्राहकांना दररोज मिळणार 3GB डेटा-कॉलिंगची सुविधा, पहा अन्य रिचार्जच्या किंमती)

>>जिओचा 1,004 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 200GB डेटा बेनिफिट्स सुद्धा युजर्सला मिळणार आहेत. यासाठी अन्य रिचार्ज प्लॅन अॅक्टिव्ह असणे गरजेचे नसणार आहे. हा प्लॅन युजर्सला कधी ही रिचार्ज करता येणार असून याची वैधता 120 दिवसांसाठी असणार आहे.

>>जिओचा 1,206 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा 1,206 रुपयांच्या प्लॅनची वैधता 180 दिवसांची असणार आहे. यामध्ये युजर्सला एकूण 240 जीबी डेटा बेनिफिट ऑफर करण्यात येत आहे. डेटा बेनिफिट्स 180 दिवसांसाठी मिळत असली तरीही राहिलेला डेटा वॅलिटिडिटीच्या कालावधीनंतर संपणार आहे. हा प्लॅन खासकरुन अधिक डेटाचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आहे.

>>जिओचा 1,208 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा एक खास प्लॅन असून यामध्ये सुद्धा 240जीबी डेटा मिळणारआहे. तर 1206 रुपयांच्या प्लॅनपेक्षा यामध्ये युजर्सला फक्त अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागणार आहेत. या प्लॅनची वैधता 240 दिवसांची असणार आहे.(खुशखबर! Vodafone आणला नवा इंटरनेट प्लान, 251 रुपयात मिळणार 50GB डेटा)

काही दिवसांपूर्वी वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी Reliance Jio ने 151, 201 आणि 251 रुपयाचे हे प्लॅन आणले आहेत. या प्लान्समध्ये इतर काहीही बदल न करता केवळ याची वैधता 30 दिवसांची असणार आहे. यातील 251 रुपयाच्या प्लानमध्ये 50GB, 201 रुपयाच्या प्लानमध्ये 40GB आणि 151 रुपयाच्या प्लानमध्ये 30GB इंटरनेटा डेटा प्लॅन ऑफर करत आहे. दरम्यान 30 दिवसांच्या कालावधीत जर इंटरनेट डेटा संपला तर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशा वेळी ग्राहकांसाठी जिओ ने 4G Data Voucher प्लान आणले आहे. ज्यात 11 रुपये, 21 रुपये, 51 आणि 101 रुपयाचे वाउचर मिळणार आहे.