BSNL ग्राहकांना दररोज मिळणार 3GB डेटा-कॉलिंगची सुविधा, पहा अन्य रिचार्जच्या किंमती
BSNL (Photo Credit: Livemint)

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सुद्धा रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन सारख्या खासगी कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. बीएसएनएल कंपनी ग्राहकांना विविध डेटा-लिमिट असणारे काही प्लॅन ऑफर करत आहे. त्यामध्ये जे ग्राहकांना अधिकतर डेटाचा वापर करतात. त्यांच्यासाठी बीएसएनएल दररोज 3जीबी डेटा असणारे प्रीपेड प्लॅन उपलब्ध करुन देत आहे. या प्लॅनची वैधता 8 दिवस ते 365 दिवसांसाठी आहे.

बीएसएनएल कंपनीचा 78 रुपयांच्या रिचार्ज हा सर्वाधिक स्वस्त प्लॅन आहे. हा रिचार्ज 8 दिवसांची वॅलिडिटी असणारा आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. त्याचसोबत युजर्सला Eros Now मनोरंजनाची सर्विसचे सब्सक्रिप्शनचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. तर जाणून घ्या बीएसएनलच्या अन्य रिचार्जच्या किंमती आणि वैधताबाबत.(Jio Platforms सोबत अबुधाबीच्या Mubadala Investment Company चा 9,093.60 कोटींचा करार; सहा आठवड्यात जिओचा 6वा करार)

BSNL चा 247 रुपयांचा प्लॅन

बीएसएनलच्या या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस दर दिवसासाठी पाठवता येणार आहेत. तसेच ग्राहकांना अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.

BSNL चा 997 रुपयांचा प्लॅन

हा कंपनीचा 6 महिन्यांचा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 180 दिवसांसाठी 3 जीबी डेटा आणि 100 एसएमस मिळणार आहेत. अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिडेट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना खासकरुन त्यांच्या आवडीची कॉलर ट्युन निवडण्याची संधी मिळणार आहे.

BSNL चा 1999 रुपयांचा प्लॅन

बीएसएनलचा हा वर्षभरासाठी प्लॅन आहे. यामध्ये युजर्सला 365 दिवसांसाठी दररोज 3जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच दररोज 100 एसएमएस पाठवता येणार आहे. त्याचसोबत ग्राहकाला मोफत कॉलर ट्युनची सुविधा आणि दोन महिन्यांसाठी Eros Now मनोरंजनाची सर्विस फ्री मिळणार आहे.