Jio Platforms सोबत अबुधाबीच्या  Mubadala Investment Company चा 9,093.60 कोटींचा करार; सहा आठवड्यात जिओचा 6वा करार
Reliance Jio (Photo Credit-Wikimedia Commons)

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited)आणि जिओ प्लॅटफॉर्मकडून आज शुक्रवार (5 जून) दिवशी अबुधाबीच्या मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी (Mubadala Investment Company) 9,093.60 कोटींची गुंतवणूक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ही कंपनी जिओमध्ये 1.85% हिस्सेदारी खरेदी करणार आहे. त्यामुळे मागील सहा आठवड्याच्या कालखंडातील हा जिओचा सहावा करार आहे.

जिओ प्‍लॅटफॉर्म्‍समध्ये यापूर्वीच फेसबुक, सिल्‍वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर या पाच कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये आता मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी चादेखील समावेश झाला आहे. सध्या जिओ प्लॅटफॉर्म जगभरातील मोठ्या टेक्नॉलॉजी आणि ग्रोथ कंपनींसोबत सुमारे 87,6 55 कोटी जमा करण्यात यशस्वी ठरली आहे. Reliance-Facebook Deal: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्सने फेसबुक आणि विविध कंपन्यांसोबत आतापर्यंत केलेले महत्त्वाचे व्यवहार.

RIL ची सब्सिडियरी जिओ प्लॅटफॉर्म ही एक नेक्स जनरेशन टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा फोकस उच्च गुणवत्ता असणार्‍या आणि स्वस्त दरात डिजिटल सर्विस भारतामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सध्या त्यांची ग्राहक संख्या 33.80 कोटी आहे.

दरम्यान मुबादला आणि रिलायंस यांच्या पार्टनरशीपबाबत मुकेश अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारताला डिजिटल राष्ट्र बनवण्याच्या या प्रयत्नांमध्ये त्यांची मोलाची साथ असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.