Reliance-Facebook Deal: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्सने फेसबुक आणि विविध कंपन्यांसोबत आतापर्यंत केलेले महत्त्वाचे व्यवहार
Reliance-Facebook Deal | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही कंपनी फेसबुक (Facebook) कंपनीसोबत नवा व्यवहार करत आहे. या व्यवहारानुसार मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची फेसबुक ही कंपनी रिलायन्स जिओ कंपनीसोबत 10% भागिदारी घेत आहे. रिलायन्स जिओ आणि फेसबुक या दोन्ही कंपन्या आपापल्या क्षेत्रातील (टेलिकॉम आणि सोशल मीडिया) अव्वल दर्जाच्या कंपन्या आहेत. त्यामुळे या व्यवहाराकडे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योगविश्वाचे लक्ष आहे. मात्र, असे असले तरी रिलायन्ससाठी हा निर्णय फारसा नवा नाही. कारण रिलायन्सने या आधीही अनेकदा असे महत्त्वपूर्ण व्यवहार जगभरातील विविध कंपन्यांसोबत केले आहेत. आपली भागिदारी विकली आणि इतर कंपन्यांची भागिदारी खरेदीही केली आहे. Reliance-Facebook Deal निमित्ताने हे व्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आले. पाहूयात रिलायन्स कंपनीने आतापर्यंत कोणकोणत्या कंपन्यांसोबत केले व्यवहार.

हॅप्टिक आणि रिलायन्स व्यवहार (Haptik and Reliance Deal)

रिलायन्स जिओ कंपनी आणि हॅप्टीक (Haptik) टेक्नॉलजी यांच्यात गेल्याच वर्षी साधारण 700 कोटी रुपयांचा गुंतवणूक व्यवहार झाला. हॅप्टिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करते. या कंपनीची रिलायन्स कंपनीने सुमारे 87 टक्के भागिदारी विकत घेतली. हॅप्टिकच्या माध्यमातून अॅमेझॉन, मायक्रोसॉप्ट आणि गूगल असिस्टेंट या कंपन्यांना शह देण्याचा रिलायन्सचा विचार आहे. (हेही वाचा, Reliance Jio मध्ये Facebook करणार 43,574 कोटींची मोठी गुंतवणूक; Global Pandemic च्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय)

सावन आणि रिलायन्स अॅप व्यवहार (Saavn and Reliance Deal)

रिलायन्स जिओ कंपनीने सावन म्यूजिक स्ट्रीमिंग अॅप कंपनीसोबत 2018 मध्ये व्यवहार केला. आजघडीला हे अॅप जिओ म्यूजीक नावाने ओळकले जाते. जिओने या कंपनीत 270 कोटी रुपये गुंतवले. रिलायन्स कंपनी या अॅपच्या माध्यमातून Gaana, स्पॉटिफाई, अॅमेझॉन म्यूजिक आणि अॅपल म्यूझिक कंपन्यांना टक्कर देत आहे. (हेही वाचा, Reliance Jio कंपनीत 10% भागिदारीसाठी Facebook इच्छुक; Google सुद्धा स्पर्धेत असल्याची चर्चा)

दरम्यान, रिलायन्स जिओ कंपनीने हॅप्टीक आणि सावन कंपन्यांप्रमाणेच डेन, हेटॉकॉम आणि हॅथवे आदी कंपन्यांसोबतही व्यवहार केले आहेत. रिलायन्स जिओ कंपनीने सुमारे 2,045 कोटी रुपयांची भलीमोठी गुंतवणूक करत डेन नेटवर्क्स कंपनीत 66% गुंतवणूक केली. याशिवाय रिलायन्सने हॅथवे केबल्स अँड डेटाकॉम कंपनीसोबतही 2,940 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.