Facebook, Reliance Jio,Google | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Reliance Jio कंपनीची 10% भागिदारी खरेती करण्यासाठी Facebook आणि Google या कंपन्या इच्छुक असल्याचे वृत्त आहे. रिलायन्स जिओ कंपनीसोबत या दोन्ही कंपन्यांची बोलणी सुरु असल्याचेही बोलले जात आहे. Financial Times ने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रिलायन्स जिओ कंपनीच्या 10% भागिदारीची किंमत कोट्यवधी डॉलर्समध्ये जात आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या स्वतंत्र रित्या रिलायन्स कंपनीसोबत बोलणी करत आहेत.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या FTने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप कंपनीची मालकी सांभाळणाऱ्या फेसबुक कंपनीसोबत हे डील करुन रिलायन्स आपल्यावरील कर्जातून मोकळे होण्याचा विचार करत आहे. दरम्यान, जिओ कंपनीची सहजोडीदार असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी ग्रुप आपला व्यवसाय अधिकाधिक विदेशी भागिदारांसोबत वाढवू पाहात आहेत. भागिदारी विकून कंपनीवर असलेले कर्ज चुकते करण्याचा रिलायन्स कंपनीचा विचार असल्याचे बोलले जात आहे.

रिलायन्स जिओ, फेसबुक अथवा गुगल यापैकी कोणत्याच कंपनीकडून याबबत अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान, फेसबुक जर रिलायन्स जिओची भागिदारी खरेदी करते तर ते भारतासाठी मोठे पाऊल असेन. स्वस्त दरात इंटरनेट देऊन रिलायन्स जिओने भारतीय बाजारात आपले स्थान बळकट केले आहे. त्यामुळे फेसबुक आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांसाठी भारत मोठी बाजारापेठ असेन. (हेही वाचा, अफवांवर चाप बसण्यासाठी WhatsApp घेऊन येणार Verification फिचर)

रिलायन्स जिओ सॉफ्ट 2015 मध्ये स्थापन झाली होती. मात्र 2016 पासून ती अधिकृतपणे बाजारपेठेत उतरली. केवळ तीन वर्षांमध्ये कंपनीने 370 मिलियन पेक्षाही अधिक ग्राहक जोडले. आज घडीला रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑफरेटर कंपनी आहे. भारतीय टेलिकॉम व्यवसायात क्रांती करण्याचे निर्विवाद श्रेय हे रिलायन्स जिओकडेच जाते. मोफत कॉल आणि सर्वात स्वस्त डेटा यामुळे रिलायन्स जिओनेन टेलिकॉम मार्केटमध्ये आपले बस्तान बसवले. तसेच, स्पर्धक कंपन्यांनाही मोठा धक्का दिला.