WhatsApp (Photo Credits: Pixabay)

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने ही एक चिंतेची बाब बनली आहे. याच दरम्यान सोशल मीडियात कोरोना संबंधित विविध अफवा पसरवल्या जात आहेत. व्हायरल केल्या जाणाऱ्या या अफवांवर चाप बसण्यासाठी व्हॉट्सअॅप एक नवे फिचर घेऊन येत आहे. व्हॉट्सअॅप असे एक फिचर घेऊन येत आहे ज्याच्यामुळे अफवांवर सहज बंदी घातली जाणार आहे. अफवा सोशल मीडियात परसण्यासाठी काही वेळ पुरेसा आहे. एकच मेसेज विविध जणांना फॉरवर्ड केल्याने काय परिणाम होतात हे दिसुन आले आहेत.

व्हॉट्सअॅफ अफवांसंबंधित एका फिचरवर सध्या काम करत आहे. हे फिचर तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजला क्रॉस चेक करणार असून तुम्हाला तो किती खरा आणि खोटा आहे हे कळू शकणार आहे. WhatsApp Beta Info यांच्यानुसार, फ्रिक्वेंटली फॉरवर्ड मेसेज सर्च करण्याचे ऑप्शन दिले जाते. जे व्हॉट्सअॅपच्या मेसेजचा लेबल सांगण्यासाठी मदत करणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे आलेला मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे हे कळू शकणार आहे. जर तुमच्याकडील मेसेज टॉप लिस्ट मध्ये सहभागी असल्यास तो अफवा असल्याचे मानले जाणार आहे.(Coronavirus: WHO ने सुरु केला व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक; कोरोना व्हायरसबाबत आता एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती)

भिंगाचे आयकॉन असलेले हे नवे फिचर असणार आहे. फॉरवर्ड करण्यात आलेल्या मेसेजवर भिंगाचा आयकॉन निवडल्यास तुम्हाला तो गुगल करुन त्याबाबत माहिती देणार आहे. याबाबत अद्याप काम सुरु असून लवकरच युजर्ससाठी लॉन्च करण्याच येईल असे व्हॉट्सअॅप कडून सांगण्यात आले आहे. हे नवे फिचर आणण्यामागे फक्त अफवांवर चाप बसणे हे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. यापूर्वी सुद्धा व्हॉट्सअॅपवरील अफवांच्या मेसेज मुळे दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले होते.