Coronavirus: WHO ने सुरु केला व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक; कोरोना व्हायरसबाबत आता एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन गेल्या काही महिन्यापासून आतापर्यंत 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाखांहून अधिक लोक कोरोना बाधीत झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लोकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या 110 हून अधिक देश कोरोना व्हायरसशी झुंज देत आहे. दरम्यान, भारतासह संपूर्ण जगात करोनाबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर फेक मेसेजेस, आणि औषधांची खोटी किंवा माहिती अनधिकृत पसरत आहे. या अफवांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन दहशत निर्माण होत आहे. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये, म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी व्हॉट्सऍप हेल्पलाईन नंबर (WhatsApp Helpline Number) सुरू केला आहे.

करोना व्हायरसने जगभरात 11 हजारांपेक्षा जास्त लोकांचे बळी घेतले आहे. त्यामुळे या गंभीर आजाराबाबत लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. भारतात करोनाचे 298 रुग्ण आढळले आहेत, तर महाराष्ट्रात 64 जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान नागरिकांना घरबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने देखील अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत. तसेच मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- अकोला जिल्ह्यात उद्यापासून सलग 3 दिवस 'Lockdown', कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

फेसबूक पोस्ट-

WHO द्वारे अशा पद्धतीने मिळवा माहिती-

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप सोबत मिळून ही सेवा सुरु केली आहे. ही सेवा नेत्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत,वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या सेवेचा लाभ होणार आहे. करोना व्हायरस संबंधित बातम्या, करोना रुग्णांची आकडेवारी, करोनाची लक्षणे, करोना संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली मार्गदर्शक तत्वे आणि वेळोवेळी केलेल्या सूचना अशा प्रकारची अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

ही सेवा मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही सेवा आपल्या व्हॉट्सऍपवर मिळवण्यासाठी +41 79 83 91 892 हा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करा. त्यानंतर आपल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट रिफ्रेश करा. तुमच्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट रिफ्रेश केल्यानंर WHO च्या नंबरवर इंग्रजीतून ‘Hi’ असा मेसेज केल्यावर तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येणार आहे.