
COVID-19 च्या जाळ्यात अधिकाधिक नागरिक अडकत चालल्यामुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन सुरु केले आहे. त्याचबरोबर भारतातही त्याचा झपाट्याने फैलाव होत असल्याकारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' ची घोषणा केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अकोला (Akola) जिल्ह्यातही उद्यापासून सलग 3 दिवसांचा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 22 मार्च ते 24 मार्च पर्यंत हा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे.
भारतात कोरोना व्हायरसचे लोण झपाट्याने पसरत चालले असून भारतात सर्वाधिक कोरोना ग्रस्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात 22 मार्च ते 24 मार्चपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. लॉक डाऊनचा अर्थ समजून घ्या आणि वेळीच घरी बसा अन्यथा प्रशासनाला कडक पावलं उचलावी लागतील; नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नागरिकांना तंबी
मुंबई महानगर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या महानगरांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी याआधीच बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आता अकोला जिल्ह्यात देखील बंदीचे आदेश देण्यात आले आहे. पुणे: पिंपरी-चिंचवड मध्ये COVID 19 च्या 90 निगेटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज
भारतात आज कोरोनाग्रस्तांची संख्या 271 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात तब्बल 63 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील 90 जणांची रुग्णांची तपासणी निगेटिव्ह (Negative Patients) आली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्यात सुरू असलेली दहावीची परीक्षा देखील या कारणामुळे खंडित करण्यात आली आहे. 23 मार्च दिवशी राज्यात होणारा महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्डाचा शेवटचा भूगोल विषयाचा पेपर आता रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मीडियाला माहिती देताना 31 मार्च नंतर राज्यातील परिस्थिती पाहून भूगोल विषयाच्या पेपरची नवी तारीख जाहीर केली जाईल अशी माहिती दिली आहे.