Coronavirus Scare (Photo Credits: IANS)

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही आपले पाय रोवले आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात आज कोरोनाग्रस्तांची संख्या 271 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात तब्बल 63 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील 90 जणांची रुग्णांची तपासणी निगेटिव्ह (Negative Patients)  आली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना संशयित रुग्णांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर सुरू होते. मात्र, यातील 90 रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अद्याप यातील 3 रुग्णांची तपासणी प्रलंबित आहे. यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा - कोरोना चाचणीसाठी राज्यात 7 ठिकाणी लॅब कार्यरत - राजेश टोपे; 21 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

दरम्यान, आज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. सध्या कोरोना चाचणीसाठी राज्यात 7 ठिकाणी लॅब कार्यरत असल्याची माहितीदेखील राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज पुण्यात परदेशात प्रवास न करूनही एका महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सिंहगड रस्ता भागात राहणारी ही 41 वर्षांची महिला उपचारांसाठी कात्रज भागातील भारती हॉस्पिटलमध्ये 16 मार्च पासून भरती होती. या महिलेने ओला कारमधून प्रवास केला होता. प्रशासनाकडून ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती याची माहिती घेण्यात येत आहे. सध्या या महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.