भारतात कोरोना व्हायरस ग्रस्तांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 315 वर- ICMR रिपोर्ट; 21 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Mar 21, 2020 11:23 PM IST
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अशातचं भारतातील रुग्णांमध्येदेखील वारंवार वाढ होत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 223 वर पोहचली आहे. राज्यात पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक तर मुंबई येथे दोन, असे चार नवे रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या 52 झाली आहे. यातील 41 जणांची प्रकृती उत्तम आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मुंबईसह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या चार शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे या सारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कोरोनाच्या भीतीमुळे मूळ गावी परतण्यासाठी नागरिकांची रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. तसेच उद्या म्हणजेच 'जनता कर्फ्यू'च्या दिवशी अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्या आणि लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटाझरच्या वाढत्या किंमती निश्चित केल्या आहेत. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी शुक्रवारी ट्विट करत ही माहिती दिली. 200 मिली सॅनिटायझरची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत 2 आणि 3 प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्याची किंमत 12 फेब्रुवारी 2020 रोजी जशी होती तशीच राहणार आहे. तसंच 2 प्लाय मास्कची किरकोळ किंमत 8 रुपये आणि 3 प्लाय मास्कची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, असेही राम विलास पासवान यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध असणार आहे.