तुकाराम मुंढे File Image (Photo credit : Facebook)

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र अजूनही नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाच्या धोक्याबाबत सजगता नसल्याने आज नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना तंबी दिली आहे. गरज असेल तरचबाहेर पडा. विनाकारण दुचाकी, चारचाकी घेऊन बाहेर फिरताना दिसल्यास आम्हांला जबरदस्ती नागरिकांना घरी बसवावं लागेल. दरम्यान लॉक डाऊनचा अर्थ समजून घ्या आणि वेळीच स्वयंशिस्त पाळायला शिका. अन्यथा नागरिकांना नाईलाजास्तव कडक पावलं उचलावी लागतील. असे ते म्हणाले आहेत. दरम्यान आज तुकाराम मुंढे यांनी नागपूर बाजारपेठांना भेट दिली होती. त्यावेळेस अनेक दुकानं उघडी दिसल्याने मुंढे यांनी दुकानदारांनाही सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.  Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 वर; राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहे. लॉक डाऊनचे आदेश नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी दिले आहेत. त्याचे पालन न केल्यास नागरिकांचेच आरोग्य धोक्यात येणार आहे. काल (20 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई शहर, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सह नागपूर शहरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान आज पत्रकार परिषदेमध्ये तुकाराम मुंढे यांनी नागपूरात कोरोना व्हायरसच्या कम्युनिटी संसर्ग बाबतच्या बातम्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. नागपूरात केवळ 4 जणांना बाधा झाली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.