Nagpur| Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान मुंबई श महाराष्ट्रात महत्त्वाची आंतरराष्ट्रीय विमानतळं असणार्‍या भागामध्ये अत्याअत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारी आस्थापनं बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज नागपूर मध्ये पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळेस त्यांनी सुरू ठेवण्यात आलेल्या दुकानदारांना शेवटचा आणि संयमाने इशारा दिला आहे. त्यानंतर तुम्ही घरी बसाल की अन्य कुठे? हे आम्हांला माहित नाही असे कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 वर; राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण.

दरम्यान मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी, चिंचवड मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सारी दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 'पॅनिक होऊ नका' म्हणत नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या Coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास टिप्स (Watch Video).  

ANI Tweet

नागपूरमध्ये 4 जण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी तिघांची परिस्थिती सुधारत असून नवा रूग्ण अद्याप न आढळल्याने आता ही नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. परंतू भविष्यात आता हा आजार अजून पसरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 63 आहे.