Reliance Jio (Photo Credits: Wikimedia Commons)

जिओने (Jio) नुकतेच आपल्या एका नव्या प्लॅनने दूरसंचार उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन (Jio Cheapest Plan) लॉन्च केला आहे. या प्लॅनची किंमत फक्त 1 रुपया आहे आणि एवढ्या कमी किमतीचा सध्या तरी कोणताही प्लॅन बाजारात उपलब्ध नाही. हा 1 रुपयाचा जिओ प्लॅन व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) आणि एअरटेल (Airtel) ला जबरदस्त टक्कर देणारा आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येईल व त्यामध्ये 100 MB डेटा मिळेल असे जिओ कडून सांगण्यात आले होते. मात्र लाँचनंतर अवघ्या काही तासांत जिओने यु-टर्न घेतला असून, या प्लॅनने सुरुवातीचे अनेक फायदे कमी करण्यात आले आहेत.

लॉन्चच्या एका दिवसानंतर या प्लॅनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, व कदाचित हे जाणून युजर्सना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. जाणून घेऊया आता जिओच्या या प्लॅनमध्ये कोणते बदल होणार आहेत.

जिओने MY Jio अॅपद्वारे आपला 1 रुपये प्लॅन सादर केला आहे आणि त्याची माहिती फक्त अॅपवरच उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लॉन्च सोबतच चर्चा होती की Jio च्या या 1 रुपयांच्या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे, परंतु MY Jio अॅप वर लिस्ट केलेल्या या प्लॅनची सध्या वैधता 1 दिवसांची असल्याचे दिसत आहे. म्हणजेच यूजर्स हा प्लॅन फक्त 24 तास वापरू शकतात. (हेही वाचा: Reliance Jio Rs 1 Plan: रिलायन्स जिओने लॉन्च केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; जाणून घ्या 1 रुपयांमध्ये काय काय मिळणार)

जिओच्या 1 रुपयांच्या प्लॅनबाबत आधी सांगण्यात आले होते की, यामध्ये 100 MB डेटा मिलेले, परंतु आता माहिती मिळत आहे की, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 1 दिवसाच्या वैधतेसाठी 10MB 4G डेटा मिळेल. परंतु 10MB डेटा संपल्यानंतरही वापरकर्ते डेटा वापरू शकतील. पण त्याचा वेग 64Kbps इतका कमी होईल.  हा प्लान फक्त डेटासाठी आणण्यात आला असून यामध्ये तुम्हाला कॉलिंग किंवा मेसेजिंग सुविधा मिळणार नाही. म्हणजेच, जर तुमच्याकडे इतर कोणताही प्लॅन सक्रिय असेल तरच तुम्ही कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. या प्लॅनमध्ये जर तुम्हाला जास्त डेटा वापरायचा असेल तर तुम्हाला 10 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. 10 रुपयांच्या रिचार्जवर तुम्हाला 100MB डेटा मिळेल.