4G डाउनलोड स्पीडमध्ये रिलायन्स Jio पुन्हा अव्वल, जाणून घ्या दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कची स्थिती
Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांची टेलिकॉम कंपनी रियालयन्स जिओने (Reliance Jio) पुन्हा एकदा 4G डाउनलोड स्पीड बाबत अव्वल क्रमांकावर पोहचली आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांचे नेटवर्क पिछाडीवर जात असल्याचे समोर आले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) द्वारे जाहीर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारवर सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने 21.0 Mbps सरासरी 4G डाउनलोड स्पीड युजर्सला दिला. जे अन्य कंपनीच्या नेटवर्कच्या तुलनेत अधिक आहे.

ट्रायच्या My Speed Portal वर शेअर करण्यात आलेल्या डेटानुसार रिलायन्स जिओ 21.0 Mbps च्या सरासरीने अव्वल ठरला आहे. त्यानंतर एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया यांचा क्रमांक लागला आहे. अन्य कंपन्यांच्या बाबत बोलायचे झाल्यास सप्टेंबर महिन्याच एअरटेलची सरासरी 4G डाउनलोड स्पीड 8.3Mbps, वोडाफोन 6.9Mbps आणि आयडिया 6.4Mbps स्पीड राहिली आहे.(Jio कंपनीने लॉन्च केले 3 नवे रिचार्ज प्लॅन, नॉन-जिओ युजर्ससाठी आता FUP)

दुसऱ्या बाजूला सप्टेंबर महिन्यात एअरटेलच्या स्पीडमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच 4G डाउनलोड स्पीड 8.2Mbps वरुन 8.3Mbps झाल्याचे दिसून आले. तर गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स जिओच्या युजर्सच्या संख्येत सुद्धा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परंतु नुकताच जिओकडून अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉलिंगकरण्यासाठी 6 पैसे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यानंतर रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्ससाठी पॉकेड फ्रेंडली रिजार्च नव्याने लॉन्च केले आहेत.

मात्र जिओवरुन जिओ क्रमांकावर किंवा जिओच्या लॅडलाईनवरुन फोन केल्यास शुल्क आकारले जाणार नाही आहेत. कंपनीने चार वाउचर सादर केले आहेत. त्यानुसार युजर्सला जिओ रिजार्च करावा लागणार आहे. परंतु महिन्याभराच्या पॅकसह हे वाउचर रिजार्च करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे