प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

रिलायन्स (Reliance)  जिओने (Jio) त्यांच्या युजर्ससाठी तीन नवे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहे. त्याला All in One प्लॅन असे नाव देण्यात आले आहे. नुकत्याच कंपनीने IUC चा हवाला देत नॉन-जिओ युजर्सला कॉलिंगसाठी पैसे स्विकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कंपनीने काही IUC Top Ups सुद्धा लॉन्च केले. मात्र आता कंपनीने याबाबत संभ्रम दूर करण्यासाठी सोपे तीन नवे प्लॅन जारी केले आहेत. जिओकडून लॉन्च करण्यात आलेले हे तिन्ही नवे प्लॅन युजर्सला अधिक डेटा देणार आहेत. तसेच अनलिमिटेड नॉन जिओ कॉलिंगसुद्धा असणार आहे. परंतु हे प्लॅन यापूर्वीसारखे अनलिमिटेड नसून महिन्याभरासाठी फक्त 1 हजार मिनिटे नॉन जिओ युजर्सला कॉल करता येणार आहे. याला अनलिमिडेटसह FUP (Fair Usage Policy) असे ही म्हटले जाते. तर जाणून घ्या कोणते तीन नवे प्लॅन जिओने लॉन्च केले आहेत.

>>222 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये युजर्सला फ्री कॉलिंग आणि 2GB डेटा प्रतिदिन मिळणार आहे. तसेच 28 दिवसांच्या या प्लॅनध्ये मात्र जिओ वरुन दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1 हजार मिनिटे मिळणार आहेत.

>>333 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 333 रुपयांच्या प्लॅन 28 दिवसांचा असून जिओ टू जिओ फ्री कॉलिंग करता येणार आहे. तसेच प्रत्येक दिवसाला 2GB डेटा देण्यात येणार आहे. तर जिओ टू जिओ महिन्याभरासाठी 1 हजार मिनिटे मिळणार आहेत.

>>444 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 444 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 3 महिने असणार आहे. त्यामध्ये युजर्सला 2GB डेटा देण्यात येणार असून जिओ टू जिओ फ्री कॉलिंग असणार आहे. मात्र नॉन जिओसाठी 1 हजार मिनिटे दिली जाणार आहेत.(Reliance Jio Diwali Offer: जिओ चा 4G फोन अवघ्या 699 रुपयात; गिफ्ट करणार असाल तर मिळणार 'हा' बोनस फायदा)

कंपनीने असे सांगितले आहे की, या प्लॅनअंतर्गत SMS आणि अॅपसाठी सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. जिओच्या सध्याच्या प्लॅनची नव्या प्लॅनसोबत तुलना केल्यास यामध्ये अधिक डेटा देण्यात येणार आहे. कंपनीने असे ही सांगितले आहे की युजर्सचे या प्लॅनमध्ये 80 रुपये वाचवणार आहेत. परंतु जर तुम्ही नॉन जिओवर 1 हजार मिनिटांपेक्षा अधिक वेळा कॉल केल्यास तुम्हाला पुन्हा IUC टॉप अप प्लॅनचा रिचार्ज करावा लागणार आहे.