Reliance Jio Diwali Offer: जिओ चा 4G फोन अवघ्या 699 रुपयात; गिफ्ट करणार असाल तर मिळणार 'हा' बोनस फायदा
Jio Smartphone, Image For Representations (Photo Crdits- Twitter)

Jio Phone In 699: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ (JIO) कंपनीद्वारे दिवाळी (Diwali 2019) विशेष एक हटके स्कीम सुरु आहे. याअंतर्गत दसऱ्यापासून दिवाळी पर्यंत ग्राहक मंडळी जिओचा फोन अवघ्या 699 रुपयात खरेदी करू शकतात. आत दिवाळीसाठी अवघा एक आठवडा शिल्लक असताना कंपनीतर्फे या स्कीम मध्ये आणखीन एक बोनस फायदा समाविष्ट करण्यात आला आहे. यानुसार, जर का तुम्ही हा जिओ चा 4G फोन कोणाला गिफ्ट करणार असाल तर त्यासोबत तुम्हाला रिचार्जचे स्पेशल प्लॅन असणारे वाऊचर सुद्धा मिळणार आहेत. हे कुपन्स तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवून त्यांना फुल पॅकेज गिफ्ट देऊन शकता.

तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या मंडळींना फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत जिओ फोन गिफ्ट कटू इच्छित असाल तर, तुम्हाला काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. यासाठी सर्वात आधी रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर जा. याठिकाणी फोन खाली 'Gift Now' असा पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला ज्या माणसाला फोन गिदत करायचा आहे त्याचा नंबर टाका. यानंतर तुम्हाला स्पेशल बंडल प्लॅन्सचे पर्याय दाखवण्यात येतील. यापैकी तुमच्या पसंतीचा पर्याय निवडून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. पेमेंट करताच हे गिफ्ट कुपन तुम्ही दिलेल्या नामाबरवर पाठवण्यात येतील. देशभरातील जिओच्या कोणत्याही दुकानात या गिफ्ट कूपनचा वापर करता येणार आहे.

JIO ट्विट

Jio युजर्ससाठी खुशखबर! मिळणार 30 मिनिटे फ्री टॉक टाइम

दरम्यान, ही स्कीम जिओच्या व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. यामुळे मुकेश अंबानी यांचे 500 मिलियन जिओ सब्स्क्राइबर्स करण्याचे ध्येय पूर्ण होणार असून अधिक युजर्स हे 2G नेटवर्क पासून 4G वर शिफ्ट होण्यास मदत होईल अशी अपेक्षा जिओ कडून वर्तवण्यात आली आहे.