जर तुम्हाला रेडमी नोट 8 खरेदी करायचा असल्यास तर त्यासाठी आजपासून पुन्हा सेल सुरु होणार आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून शाओमीच्या या लेटेस्ट बजेट मधील स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तसेच स्मार्टफोन अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वरुन सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात रेडमी नोट 8 स्मार्टफोन कंपनीकडून लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनसाठी प्रीमियम फिचर्स सारखे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसर ही दिला आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना कॅशबॅकसह डबल डेटा स्मार्टफोन खरेदीवर मिळणार आहे.
रेमडी नोट 8 च्या 4GB रॅम असलेला स्मार्टफोनमध्ये 64 GB स्टोरेज आणि 6GB रॅम असलेला स्मार्टफोनमध्ये 128GB स्टोरेज दिला आहे. या फोनची सुरुवाती किंमत 9,999 रुपये असून टॉप वेरियंटची किंमत 12,999 रुपये आहे. मूनलाइट व्हाईट, नेप्च्युन ब्लू आणि स्पेस ब्लॅक या रंगाच्या ऑप्शनमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. आजच्या सेलमध्ये स्मार्टफोन बेस्ट डीलसह उपलब्ध करुन दिला जाणार आहे. जर तुम्ही एअरटेल प्रीपेड युजर्स असल्यास तुम्हाला स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर डबल डेटा फुकटात मिळणार आहे. डबल डेटा बेनिफिट 249 रुपये आणि 349 रुपयांचा रिचार्जवर मिळणार आहे. एचडीएफसीच्या डेबिट कार्ड वापरुन खरेदी करणार असल्यास त्यावर 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच एचएसबीसी कार्डवर 5 टक्के सूट दिली जाणार आहे.(Facebook आणि Twitter ला टक्कर द्यायला विकिपीडियाचा नवा उपक्रम- WT:Social)
या स्मार्टफोनच्या अन्य फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास , अॅन्ड्रॉइड 9pie आधारित MIUI 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. तसेच Full HD+ डिस्प्ले 6.39 इंचाचा दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलसह 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर दिला आहे. फोन 128GB पर्यंत Internal Storage असून मायक्रो SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार आहे.