स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या रेडमी सिरीजच्या स्मार्टफोन्सची सध्या ग्राहकांमध्ये चलती आहे. खिशाला परवडेल अशा किंमतीत एकाहून एक आकर्षक फिचर्स असलेले हे स्मार्टफोन्स ग्राहक खूप पसंत करतायत. त्यामुळे ग्राहकांची ओढ आणि गरज लक्षात घेता पॉप सेल्फी कॅमे-यासह (Pop Up Selfie Camera) रेडमी नोट 8 प्रो (Redmi Note 8 Pro) हा स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. 29 ऑगस्टला चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच होणार आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, चीनी सोशल मिडिया साइट 'वेइबो' (Weibo) वर नोट 8 प्रो ची झलक दाखवली आहे. यामध्ये त्याच्या मागच्या बाजुला तीन कॅमेरे तर चौथा कॅमेरा उजव्या बाजूला असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा- 10,000 किंमतीत येणारे भारतातील हे 5 स्मार्टफोन्स आहेत कॅमे-याच्या बाबतीत अव्वल
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 8 प्रो च्या मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलाय. तसेच स्नॅपड्रॅगन 700 सीरिज चिपसेट आणि मोठी बॅटरी असेल. हे डिवाइस अॅनड्रॉईड 9.0 वर आधारित MIUi 10 वर चालेल असा अंदाज आहे. त्याशिवाय यात पॉप अप सेल्फी कॅमे-यासह बरेच आकर्षक फिचर्स पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ही कंपनी 29 ऑगस्टला रेडमी नोट 8 प्रो सह रेडमी नोट 8 हा स्मार्टफोन देखील लाँच करणार असल्याचे सांगण्यात येतय. याशिवाय कंपनी रेडमी टीव्ही देखील लाँच करण्याची शक्यता आहे.