Redmi 9 Power स्मार्टफोन भारतात लॉन्च, 22 डिसेंबर रोजी पहिला ऑनलाईन सेल; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Redmi 9 Power India Launch (Photo Credits: Redmi India)

चायनीज स्मार्टफोन कंपनी रेडमी 9 पॉवर (Redmi 9 Power) स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या हँडसेटचा पहिला सेल 22 डिसेंबर पासून अॅमेझॉन इंडिया (Amazon India), एमआय.कॉम (Mi.com), एमआय होम्स (Mi Homes), एमआय स्टुडिओ (Mi studio) आणि इतर रिटेल चॅनल्सवर सुरु होईल. रेडमी 9 पॉवर हा रेडमी नोट 9 4G चा रि-ब्रँडेड व्हर्जन आहे. रेडमी नोट 9 4G हा स्मार्टफोन गेल्या माहिन्यात चीनमध्ये लॉन्च झाला होता. या स्मार्टफोन मध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी+डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच 48MP चा क्वार्ड रिअर कॅमेरा, स्पॅनड्रॅगन 662 Soc, 6000mAh ची बॅटरी आणि इतर फिचर्स देण्यात आले आहेत. (ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर OnePlus8T 5G, Redmi Note 9 Pro, Mi Band 5 सह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स, डिस्काऊंट)

Redmi 9 Power मध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी+आयपीएस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले 2340x1080 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्पॅनड्रगन 662 Soc प्रोसेसर Adreno 610 GPU सह देण्यात आला आहे. यात क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 48 MP चा मेन शूटर, 8MP चा अल्ट्रॉ-वॉईल्ड-एंगल-लेन्स, 2MP ची लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे, त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 6000 mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. हा फोन अॅनरॉईड 10 च्या MIUI 12 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या हँडसेटचे दोन वेरिएंट उपलब्ध आहेत. पहिला वेरिएंट- 4GB रॅम + 64GB इंटरनल स्टोरेज आणि दुसरा वेरिएंट- 4GB रॅम+ 128GB इंटरनल स्टोरेज. हा स्मार्टफोन चार आकर्षक रंगात उपलब्ध आहे- Mighty Black, Fiery Red, Electric Green and Blazing Blue.

Redmi 9 Power (Photo Credits: Redmi India)
Redmi 9 Power (Photo Credits: Redmi India)

कनेक्टीव्हीसाठी यात 4G VoLTE, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS/A-GPS आणि इतर पर्याय दिले आहेत. Redmi 9 Power च्या 4GB+64GB वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 4GB+128GB वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.