Redmi 9 Launched in India (Photo Credits: Redmi India)

शाओमी (Xiaomi)  कंपनीचा सब ब्रॅन्ड असणाऱ्या रेडमीने (Redmi) त्याचा नवा स्मार्टफोन Redmi 9 अखेर भारतात आज लॉन्च केला आहे. खिशाला परवडेल अशा किंमतीत हा स्मार्टफोन नागरिकांसाठी उतरवला असून तो भारतात सेलसाठी येत्या 31 ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे. याचा सेल दुपारी 12 वाजल्यापासून अॅमेझॉन आणि mi.com येथे सुरु असणार आहे. असे सुद्धा म्हटले जात आहे की, सणासुदीचे दिवस पाहून Redmi 9A सुद्धा लॉन्च करण्यात येईल. जो रेडमी 9 या स्मार्टफोनचे लाईट वर्जन असेल. नव्या स्मार्टफोनसाठी 4जीबी रॅम आणि 128 पर्यंत स्टोरेज दिला आहे. यामध्ये ऑरेंज रंग सुद्धा उपलब्ध केला आहे.

रेडमी 9 हा स्मार्टफोन दोन वेरियंटमध्ये येणार आहे. त्यापैकी 4GB+64GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 8999 रुपये आहे. तर फोनच्या 4GB+128GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलसाठी युजर्सला 9,999 रुपये मोजावे लागणार आहेत. फोनध्ये कंपनीने ऑरा एज डिझाइस (Aura Edge Design) दिले आहे. हा स्मार्टफोन स्काय ब्लू, स्पोर्टी ऑरेंज आणि कार्बन ब्लॅक रंगात खरेदी करता येणार आहे.(Xiaomi ने लॉन्च केला स्मार्ट Oven, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा HD+IPS डिस्प्ले दिला आहे. ज्याचा अस्पेक्ट रेशियो 20:9 असा आहे. पुढील बाजूल डिस्प्ले नॉच आणि मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 3.5mm चा हेडफोनसाठी जॅक देण्यात आला आहे. स्मार्टफोन 4जीबी रॅम आणि 64 जीबी/128जीबी स्टोरेजसह मिळणार आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. दरम्यान, कंपनीचा हा पहिलाच स्मार्टफोन असा आहे जो अॅन्ड्रॉइड 10 च्या आधारावर MIUI 12 सह लॉन्च करण्यात आला आहे.(Redmi K20 Pro Temporary Price Cut In India: रेडमी के20 प्रो स्मार्टफोन 4 हजाराने झाला स्वस्त; ऑफर 31 ऑगस्टपर्यंत)

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर दिला आहे. त्याचसोबत AI Scene Detection, Portrait Mode आणि Pro Mode सारखे फिचर्स सुद्धा दिले आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह येणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, स्मार्टफोनची बॅटरी 2 दिवस बॅटरी बॅकअप देणार आहे.