Redmi 8 स्मार्टफोन आज 299 रुपयांत खरेदी करण्यासाठी 12 वाजता सुरु होणार सेल
Redmi 8 (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी शाओमीने (Xiaomi) 5000 एमएएच बॅटरीपेक्षा कमी असणाऱ्या रेडमी 8 (Redmi 8) लॉन्च केला होता. त्याचसोबत या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली होती. रेडमी 7 चा हा अपग्रेडेट फोन आहे. भारतीय बाजारात या फोनची टक्कर Realme 5 आणि Samsung Galaxy M20 सोबत आहे. रेडमी 8 हा स्मार्टफोन अवघ्या 299 रुपयांत खरेदी करण्यासाठी आज 12 वाजता सेल सुरु होणार आहे. हा सेल ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दाखवला जाणार आहे.

रेडमी 8 स्मार्टफोन दोन वेरियंट मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये 3GB RAM, 32GB Storage पेक्षा कमी असणारा स्मार्टफोन 7,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेजपेक्षा कमी असणारा वेरियंट स्मार्टफोन 8,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.(Xiaomi चा फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात धडकणार; मोबाईलमध्ये असणार 5 पॉप-अप कॅमेरे)

ऑफर्स बाबत बोलायचे झाल्यास ग्राहकांनी रेडमी 8 स्मार्टफोनचे पैसे Flipkart Axis Bank Buzz Crdit card वरुन करणार असल्यास 5 टक्के सुट देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना हा स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करता येणार आहे. तसेच ग्राहकांना 1 वर्षापर्यंत स्मार्टफोनवर वॉरंटी मिळणार आहे. त्याचसोबत एक्सचेंज व्यॅल्यू मिळाल्यानंतर युदर्जला हा फोन फक्त 299 रुपयांत खरेदी करता येणार आहे. Mi.com वर सुद्धा ग्राहकांना एक्सचेंज ऑफर्ससह खरेदी करता येणार आहे.तसेच एक्सीडेंटल आणि लिक्वीड डॅमेज कव्हर सोबत ग्राहकाला 2 वेळा क्लेम करता येणार आहे.