Realme Watch S, Watch S Pro & Buds Air Pro Master Edition (Photo Credits: Realme India)

चायनीज स्मार्टफोन कंपनी रियलमी ने नवी वॉच सिरीज आणि बड्स एअर प्रो मास्टर एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. Watch S चा सेल 28 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरु होत आहे तर Watch S Pro चा वॉच 29 डिसेंबर दुपारी 12 पासून सुरु होणार आहे. रिअलमी बड्स प्रो मास्टर एडिशन ची विक्री 8 जानेवारी 2021 पासून दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर सुरु होणार आहे. रियलमी वॉच एस सिरीजमध्ये Watch S, Watch S Master Edition आणि Watch S Pro चा समावेश आहे.

स्टायलिश रियलमी वॉच एस प्रो मध्ये 100 पेक्षा अधिक वॉच फेसेस आणि खूप सारे वॉच स्ट्रॅपचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. वॉच एस प्रो मध्ये 1.39 इंचाचा AMOLED touchscreen डिस्प्ले दिला असून गोरिला ग्लास प्रोटेक्शन आणि 454x454 पिक्सलचे रिजोल्यूशन देण्यात आले आहे, या वॉचमध्ये ऑटो ब्रॉईटनेस फिचर असल्यामुळे तुम्ही घरात किंवा घराबाहेर सहजरित्या डिस्प्ले पाहू शकाल. या 420mAh ची बॅटरी दिली असून 2 आठवड्यापर्यंतचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

पहा ट्विट:

रियलमी वॉच एस प्रो मध्ये 2 प्रोसेसर दिले असून रिअल टाईम हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनेटरिंग, अॅक्टीव्हीटी ट्रॅकिंग, ड्रिंग रिमांडर आणि स्लिप मॉनेटरिंगसारखे फिचर्स दिले आहेत. वॉच एस प्रो मध्ये वॉकिंग, आऊटडोअर रनिंग, योगा, स्विमिंग, क्रिकेट यांसारखे 15 स्पोर्ट्स मोड्ससुद्धा दिले आहेत. हे वॉच  5ATM water-resistant आहे. या वॉचमधून तुम्ही तुमचे फोन कॉल्स रिजेक्ट करु शकता. त्यासोबतच तुमचा म्युझिक आणि कॅमेरा देखील कंट्रोल करु शकता.

Realme Watch S Pro (Photo Credits: Realme India)

रिअलमी वॉच एस मध्ये 1.3 इंचाचा रॉऊड 360x360 पिक्सलसह टचस्क्रिन डिस्प्ले दिला असून Gorilla Glass प्रोटेक्शन दिले आहे. वॉच एसमध्ये

Realme Watch S (Photo Credits: Realme India)

600nits इतकी ब्राईटनेस लेव्हल दिली असून  390mAh बॅटरी लेव्हल दिली आहे. ही बॅटरी 15 दिवसांपर्यंत चालते. या वॉचमध्ये हार्ट रेट ट्रॅकिंगसोबत ब्लड ऑक्सिजन लेव्हल ट्रॅकिंगसुद्धा आहे. या वॉचमध्ये फुटबॉल, सायकलिंग, बँटमिंटन यांसारखे 16 स्पोर्ट्स मोड्स आहेत. हे वॉच स्मार्टफोन सोबत कनेक्ट केल्यास तुमच्या मोबाईलचे सर्व नोटिफिकेशन तुम्ही मोबाईलवर पाहू शकाल.

 

Realme Buds Air Master Edition (Photo Credits: Realme India)

या स्मार्टवॉचेस सोबत रियलमीने बड्स प्रो मास्टर एडिशन लॉन्च केले आहे. यात 10mm चा बास बुस्ट ड्रायव्हर दिला असून 25 तासांची बॅटरी लाईफ दिली आहे. यामध्ये गेमिंग मोड आणि नॉईस रिडक्शन सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. रिअलमी बड्स एअर प्रो मास्टर एडिशनची किंमत 4,999 रुपये इतकी आहे. रियलमी वॉच एस ची किंमत 4999 इतकी असून वॉच एस प्रो ची किंमत 9.999 रुपये इतकी आहे. तर वॉच एस मास्टर एडिशनची किंमत 5999 रुपये इतकी आहे.