Realme कंपनीने नुकताच आपला रिअलमी बँन्डचे अपग्रेडेट मॉडेल Realme Band 2 हे मलेशियात लॉन्च केले होते. अशातच आता कंपनीने हा फिटनेस बँन्ड भारतात येत्या 24 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्याचे जाहीर केले आहे. हे फिटनेस बँड इंटर चेंजेबल स्ट्रॅपसह येणार आहे. यामध्ये मोठा डिस्प्ले दिला जाणार आहे. या व्यतरिक्त 90 स्पोर्ट्स मोड आणि कॉल-मेसेज नोटिफिकेशन सारखे फिचर मिळणार आहेत.
Realme Band 2 ची मलेशियातील किंमत 169 आरएम म्हणजेच जवळजवळ 3 हजार रुपये आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, हा फिटनेस बँन्ड भारतात 2-3 हजार रुपयांच्या दरम्यान उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो. मात्र कंपनीने अद्याप या फिटनेस बँन्डच्या भारतातील किंमतीबद्दल काही स्पष्ट केलेले नाही.(Infinix Hot 11 S, Hot 11 स्मार्टफोन्स भारतात लॉन्च; पहा काय आहेत फिचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)
या फिटनेस बँन्डमध्ये 1.4 इंचाचा कलर डिस्प्ले दिला आहे. याचे रेजॉल्यूशन 167x320 पिक्सल आणि ब्राइटनेस 500 निट्स आहे. यामध्ये 50 वॉच फेससह ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलरचे स्ट्रेप्स दिले आहेत. तसेच फिटनेट बँन्ड मध्ये पीपीजी ऑप्टिकल हार्ट-रेट सेंसर मिळणार आहे. जो प्रत्येक पाच मिनिटानंतर युजर्सचे हार्टबीट मॉनिटर करणार आहे.
Realme Band 2 मध्ये रक्तातील ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर करण्यासाठी SpO2 सेंसर दिला आहे. हा फिटनेस बँन्ड 90 स्पोट्स मोडसह येणार आहे. यामध्ये रनिंग, वॉकिंग आणि सायकलिंग सारख्या अॅक्टिव्हिटीचा समावेश आहे. तसेच फिटनेस बँन्डला 50ATM ची रेटिंग मिळाली आहे. यामध्ये 204mAh ची बॅटरी दिली आहे. याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये 12 दिवसांचा बॅकअप देणार आहे.
दरम्यान रिअलमी फिटनेस बँन्ड व्यतिरिक्त Smart TV Neo सुद्धा लॉन्च केला जाणार आहे. यामध्ये ग्राहकांना 32 इंचाची स्क्रिन मिळणार आहे. याचा डिस्प्ले बेजल लेस असणार आहे. तसेच शानदार साउंडसाठी 20 वॅटचा डुअल स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट मिळणार आहे. या व्यतिरिक्त टीव्ही मध्ये लो ब्लू लाइटचा सपोर्ट मिळू शकतो.