Infinix Hot 11S (Photo Credits: Infinix Mobile)

इनफिनिक्स (Infinix) ने नवीन इनफिनिक्स 11 सिरीज (Infinix 11 Series) भारतात लॉन्च केली आहे. हॉंगकॉंग मधील स्मार्टफोन कंपनीने दोन बजेट स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत- Vanilla Hot 11 and Hot 11S.  दोन्ही स्मार्टफोन्स सिंगल कॉन्फिग्रेशनमध्ये उपलब्ध आहे- 4GB+64GB. या स्मार्टफोन्सचा सेल 21 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट (Flipkart) वर सुरु होत आहे.

Vanilla Hot 11 स्मार्टफोन 8,999 रुपयांना उपलब्ध असून Hot 11S स्मार्टफोन 10,999 रुपयांना उपलब्ध आहे. Hot 11 स्मार्टफोन चार रंगात उपलब्ध आहेत- 7 Degree Purple, Silver Wave, Emerald Green आणि Polar Black. Hot 11S हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहेत- Green Wave, Polar Black आणि 7 Degree Purple.

Hot 11S मध्ये 6.78 इंचाचा FHD+ IPS LCD पॅनल पंचहोल डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यात MediaTek Helio G88 SoC प्रोसेसर असून 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला असून 50MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणइ AI Lens देण्यात आली आहे. यात 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

Infinix Hot 11S (Photo Credits: Infinix Mobile)

या मोबाईलमध्ये MediaTek Helio G70 SoC प्रोसेसर दिला आहे. यासह 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. यामध्ये रियल ड्युएल कॅमेरा दिला असून यात 13MP चा प्रायमरी लेन्स आणि AI लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP चा व्हिडिओ कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5200 mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. हे दोन्ही फोन्स  Android 11 वर आधारित XOS 7.6 वर कार्यरत आहेत.