भारतात 5G नेटवर्क सुरु होण्याआधी तयार आहे RealMe 5G स्मार्टफोन
RealMe 5G Phone (Photo Credit: IANS)

भारतात 5G नेटवर्क(5G Network) सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशातच स्मार्टफोन कंपनी रियलमी(RealMe)ने आपला नवा रियलमी 5G स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. मात्र हा स्मार्टफोन लाँच होण्याची वेळ अजून निश्चित करण्यात आली नसल्याची रियलमी चे सीईओ माधव सेठ (Madhav Seth)  यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुढील 3 महिन्यांसाठी 5G नेटवर्क ट्रायल वर असेल. मात्र जर ऑपरेटरला ट्रायलचा कालावधी वाढावायचा असेल, तर आणखी एक वर्षासाठी वाढवू शकतो. असेही त्यांनी सांगितले. भारतात असलेल्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया ह्या 5G ट्रायल साठी तयार आहेत.

रियलमी अलिकडेच आपला रियलमी 3 (RealMe 3) स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. ह्यात 1.70 लाखांपेक्षा जास्त रियलमी 3 स्मार्टफोन ऑनलाईन विकले गेले. 2019 च्या अखेरपर्यंत 1.5 करोड स्मार्टफोन विकण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे माधव सेठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दमदार स्टोरेजसह Realme U सिरीजचा नवा फोन लवकरच भारतात होणार लॉन्च

Realme लवकरच एक नवा फोन लॉन्च करणार आहे. याची खासियत म्हणजे याचे स्टोरेज दमदार असेल. Realme U1 यात फोनमध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिजोल्यूशन 19.5:9 आहे. यात मीडियाटेक हिलिओ पी70 प्रोसेसर आहे. यात 3 जीबी आणि 4 जीबी रॅम असलेले दोन वेरिएंट उपलब्ध आहेत. तसंच इनबिल्ट स्टोरेजसाठी 32 जीबी आणि 64 जीबी वेरिएंटचा पर्याय उपलब्ध आहे. हा फोन अॅनरॉईड 8.1 बेस्ड कलर ओएस 5.2 वर चालतो. अपर्चर एफ/2.0 सह 25 मेगापिक्सलचा यात फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.