Realme U1 Smartphone Launched in India (Photo Credits: File Photo)

ओपोचा (Oppo) सब ब्रँड Realme एक नवा फोन लवकरच लॉन्च करणार आहे. याची खासियत म्हणजे याचे स्टोरेज दमदार असेल. अलिकडेच कंपनीने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत Realme U सिरीजमधील नवा फोन लॉन्च होणार असल्याचे संकेत दिले. मात्र नेमका कोणता फोन लॉन्च होणार याची स्पष्ट माहिती व्हिडिओतून मिळत नाही. तरी देखील कंपनी Realme U2 लॉन्च करेल, अशी चर्चा आहे.

Realme U1 ची किंमत कमी केल्यानंतर कंपनीने हा व्हिडिओ लॉन्च केला आहे. त्यामुळे कंपनी Realme U2 हा फोन लॉन्च करणार असल्यामुळे Realme U1 ची किंमत कमी करण्यात आली आहे, असे बोलले जात आहे.

Realme कंपनीने ट्विट केलेला व्हिडिओ:

Realme U1 फोनचे फिचर्स:

Realme U1 यात फोनमध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिजोल्यूशन 19.5:9 आहे. यात मीडियाटेक हिलिओ पी70 प्रोसेसर आहे. यात 3 जीबी आणि 4 जीबी रॅम असलेले दोन वेरिएंट उपलब्ध आहेत. तसंच इनबिल्ट स्टोरेजसाठी 32 जीबी आणि 64 जीबी वेरिएंटचा पर्याय उपलब्ध आहे. हा फोन अॅनरॉईड 8.1 बेस्ड कलर ओएस 5.2 वर चालतो. अपर्चर एफ/2.0 सह 25 मेगापिक्सलचा यात फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.