ओला इलेक्ट्रीक स्कुटर (Ola Electric Scooter) आज (रविवार, 15 ऑगस्ट) अखेर भारतात लॉन्च झाली. यात दोन वेरिएंट उपलब्ध आहेत- S1 आणि S1 Pro. सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी सांगितले की, या स्कूटरची डिझाईन आणि टेक्नॉलॉजी सर्वोत्तम असून स्कूटरचा परफॉर्मन्स देखील उत्तम आहे. ओलाच्या या नव्या स्कूटर्स प्री-बुकींग केलेल्यांना 8 सप्टेंबर, 2021 पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. याची डिलिव्हरी ऑक्टोबर 2021 पासून मिळायला सुरुवात होईल.
ओला स्कूटर्स दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत- S1 आणि S1 Pro. ओला एस1 0 ते 40 किमी प्रति तास अगदी 3.6 सेकंदात जाते. या गाडीचा टॉप स्पीड 90 kmph इतका आहे. यामध्ये 8.5 kW ची पॉवर लागत असून एका चार्जमध्ये 121 किमी चालते. (Ola Electric scooter : ओला इलेक्ट्रिकने आपल्या नवीन दर्जेदार ई-स्कूटरचे सुरू केले बुकिंग, जाणून घ्या कसे कराल प्री-बुकिंग)
Ola Electric Tweet:
The revolution is live! Tune-in now and see the magical features we’ve worked so hard to build into our S1 scooter! ! #JoinTheRevolution https://t.co/A4LRzVZHOX
— Ola Electric (@OlaElectric) August 15, 2021
ओला एस1 प्रो चा टॉप स्पीड 115 kmph इतका असून 0 ते 40 kmph 3 सेकंदात पोहचते. या गाडीला 8.5 kW ची पावर लागत असून एका चार्जमध्ये 181 किमी गाडी चालते. एस1 मॉडलमध्ये 2.9kWh ची बॅटरी असून एस1 प्रो मध्ये 3.9 kWh ची बॅटरी आहे. ओला इलेक्ट्रीक स्कूटर हे 10 वेगवेगळ्य रंगात उपलब्ध असेल.
ओलाची नवी स्कूटर तीन मॉड्समध्ये उपलब्ध आहे- normal, sport आणि hyper. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी ग्राहक 750W च्या पोर्टेबल चार्जर वापरु शकतात. हा चार्जर वापरल्यास अगदी 6 तासामध्ये गाडी फुल चार्ज होईल. किंवा ओला हायपर चार्जर नेटवर्कमध्ये जाऊन तुम्ही गाडी चार्ज करु शकता. इथे अगदी 18 मिनिटांमध्ये तुमची गाडी 50 टक्के चार्ज होईल.
या गाडीमध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला असून 3 जीबी रॅम आणि ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. यासोबतच 4जी, वायफाय, जीपीएस, ब्लुट्युथ, व्हाईस असिस्टंट अॅलेक्सा आणि बिल्डइन स्पीकर्स दिले आहेत. दरम्यान, एस1 वेरिएंटची किंमत 99,999 रुपये (ex-showroom) इतकी असून एस1 प्रो ची किंमत 1,29,999 रुपये ex-showroom) इतकी आहे.