सातत्याने PUBG खेळल्यामुळे मानसिक संतुलन बिघडून ट्रेनरची रुग्णालयात भरती
PUBG Game (Photo Credits: Twitter)

PUBG सध्याच्या दिवसात गेमझोन्समध्ये फार लोकप्रिय मानला जात आहे. जगात मोठ्या संख्येने पबजी हा गेम खेळला जातो. मात्र पबजी खेळण्याची लत एखाद्याला एवढे वेडे करुन सोडत आहे की, 24/7 वेळ ही गेम खेळण्यासाठी अपूरा पडत आहे. अशीच एक घटना जम्मू येथील एका फीटनेस ट्रनेरसोबत घडली आहे. या ट्रेनरने सातत्याने 10 दिवस पबजी गेम खेळ्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. परिणामी त्याची भरती रुग्णालयात करावी लागली आहे.

UNI च्या रिपोर्ट्सनुसार, फिटनेस ट्रेनरला पबजी सातत्याने खेळण्याची सवय लागली होती. या सवयीचे रुपांतर नंतर हळूहळू वाढत जाऊन त्याने 10 दिवस सातत्याने पबजी खेळण्यास सुरुवात केली. यामुळे 10 व्या दिवशी ट्रेनरचे पबजीमधील मिशन पूर्ण झाले खरे, मात्र मानसिक संतुलनच तो गमावून बसला. मानसिक संतुलन बिघडल्याने हा ट्रनेर स्वत:लाच इजा करुन घेऊ लागल्याने त्याला उपचाराठी रुग्णालयात भरती करावे लागले. ( हेही वाचा-PUBG खेळणाऱ्यांसाठी खुशखबर; गेम खेळून जिंका 1 कोटी रुपये)

या प्रकरणी डॉक्टरांनी सांगितले की, सध्या या तरुणाची स्थिती अस्थिर असून त्याचा मानसिक संतुलनावर परिणाम झाला आहे. परंतु पबजीमुळे अजूनही त्याला गेम्समधील मिशनचे परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे जम्मूतील स्थानिक लोकांनी पबजी गेमवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.