PUBG Game (Photo Credits: Twitter)

PUBG Mobile India Series 2019 Tournament: मोबाईल गेम्सची सध्या चलती आहे. बहुतांश तरुण/तरुणी मोबाईलमध्ये डोके घालून गेम्स खेळताना दिसतात. आता मात्र या गेम खेळण्याला वय आड येत नाही. त्यामुळेच लहानांपासून-थोरामोठ्यांपर्यंत अनेकजण मोबाईल गेम्सचा आनंद घेताना दिसतात. अनेक गेम्सची क्रेझ असली तरी सध्या मात्र एका गेमने सर्वांनाच भूरळ घातली आहे तो म्हणजे प्लेअर्स अननोन बॅटल ग्राऊंड म्हणजे PUBG. या गेमने भारतात धुमाकूळ घातला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोबाईलमध्ये गेम खेळाणारे या PUBG ला पहिली पसंती देत आहेत. भारतातील या गेमची लोकप्रियता लक्षात घेऊन गेमच्या डेव्हलपर्सने भारतात सर्वात मोठ्या टुर्नामेंटचे (Tournament) आयोजन केले आहे. या टुर्नामेंटमध्ये जिंकणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

गेल्यावर्षी 'Campus Championship' नंतर PUBG 'Mobile India Series 2019' या टेनसेंट गेम्सची ही दुसरी सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. गेल्यावर्षीचे टुर्नामेंट फक्त कॉलेज आणि युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. यंदा मात्र या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकतं. विशेष म्हणजे यात कोणतीही रजिस्ट्रेशन फी देखील आकारली जाणार नाही. मात्र टुर्नामेंट भाग घेण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे या गेममध्ये 20 लेव्हल पार केलेल्या व्यक्तीलाचा टुर्नामेंटमध्ये भाग घेता येईल.

या टुर्नामेंटसाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले असून 23 जानेवारी ही रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे. या टुर्नामेंट भाग घेण्याची इच्छा असल्यास http://pubgmobile.in/indiaseries या लिंकवर जावून लॉग इन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्कॉड आयडी मिळेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही स्कॉडमध्ये सहभागी होऊ शकता किंवा स्वतःचे स्कॉड बनवून आपल्या फ्रेंड्सला इनव्हाईट (Invite) करु शकता. या टुर्नामेंटमध्ये दोन क्वॉलिफाईंग राऊंडसोबत एक ग्रँड फिनाले (Grand Finale) होईल. हा सर्व गेम आशिया सर्व्हर रिजनमध्ये थर्ड पर्सन मोडमध्ये खेळू शकता.

असे असतील तीन राऊंड्स:

# पहिला क्वॉलिफाईंग राऊंड 21-27 जानेवारीपर्यंत होईल. ज्यात सर्व रजिस्टर्ड प्लेअयर्सला (registered players) आपल्या स्कॉड मेंबर्ससोबत Erangel मध्ये 15 क्लासिक राऊंड्स खेळावे लागतील. यातील 10 सर्वोत्तम राऊंडमध्ये किल काऊंट, रँक, सर्व्हाइव्हल टाईम, अॅक्युरेसी, टीम प्ले इत्यादींच्या आधारावर प्लेअर्सला पुढच्या राऊंडसाठी निवडले जाईल.

# दुसऱ्या क्वॉलिफायर्स राऊंडला 'Online Playoffs' असे नाव देण्यात आले आहे. हा राऊंड 10-24 फेब्रुवारीदरम्यान खेळला जाईल. याचा पहिला राऊंड 10-15 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. ज्यात 2000 स्कॉड्सला 20-20 साठी 100 स्कॉड्समध्ये विभागले जाईल. त्यानंतर सर्व ग्रुपमधील सदस्य एकमेकांनाशी फाईट करतील आणि त्यानंतर सर्व ग्रुपमध्ये 4-4 स्कॉड्सला पुढच्या राऊंडसाठी निवडण्यात येईल. Playoffs चा दुसरा राऊंड 16-19 फेब्रुवारीपर्यंत होईल. ज्यात पहिल्या राऊंडमध्ये 400 स्कॉड्स 20-20 स्कॉडसाठी 20 स्लॉटमध्ये विभागले जाईल. ते सर्व एकमेकांनाशी लढतील आणि त्यानंतर टॉपच्या 4 स्कॉडला थर्ड राऊंडसाठी निवडण्यात येईल.

# यानंतर तिसरा राऊंड 21-24 फेब्रुवारी दरम्यान होईल. यात 80 जणांना 20-20 च्या चार ग्रुपमध्ये विभागले जाईल आणि यातील पाच स्कॉड ग्रँड फिनालेसाठी निवडले जातील. ग्रँड फिनाले सोहळा मार्चमध्ये रंगेल. ज्यात टॉप 20 टीम असतील ज्या लास्ट राऊंडसाठी खेळतील आणि चिकन डिनरसह कोट्यावधींचे बक्षीस जिंकतील.

तुम्हीही PUBG खेळता? मग कोट्यावधींचे बक्षीस जिंकण्याच्या या संधीचा अवश्य लाभ घ्या.